शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भावपूर्ण अनुभूतीचे ‘क्षण एक पुरे...’

By admin | Updated: November 3, 2014 00:43 IST

समाजातील भौतिक सुखांपुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणाईच्या संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकणारे नाट्य म्हणजे ‘क्षण एक पुरे..’ आज अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या

दीपरंग महोत्सव : स्वानंद संस्थेचे सादरीकरण नागपूर : समाजातील भौतिक सुखांपुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणाईच्या संकुचित मानसिकतेवर प्रकाश टाकणारे नाट्य म्हणजे ‘क्षण एक पुरे..’ आज अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित दीपरंग नाट्य महोत्सवात सादर करण्यात आले. भावपूर्ण अनुभूतीचे हे नाट्य रसिकांची दाद घेणारे होते. मानवी जीवनातील सर्वच वळणांवर प्रेम, माया, जिव्हाळा या बाबी सुखी व आनंदी जगण्यासाठी अनिवार्य असतात. काही युवकांना मात्र आपल्या गुलाबी प्रेमापुढे घरातील म्हातारी माणसे नकोशी वाटतात. नाना आणि त्याची प्रेयसी तृप्ती यांच्या अनुषंगाने पुढे जाणारे हे नाट्य होते. अंथरुणाला खिळलेले भाऊ, त्यांच्यामुळे उद्भवणारे वाद अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाट्य होते. आईच्या जाण्यानंतर मात्र तृप्तीला जीवनातल्या खऱ्या प्रेमाचे महत्त्व कळते. ती भाऊंचा राग करीत असते पण त्याच भाऊंमुळे नाना तिचा स्वीकार करतो. स्वानंद संस्थेतर्फे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. लेखिका माणिक वड्याळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या भावपूर्ण प्रयोगाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. ऐन तारुण्यात पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता नोकरी सांभाळून घरातील जबाबदाऱ्या निभावणारी, म्हाताऱ्या सासऱ्याची सेवा करणारी सुलभा तर जबाबदाऱ्या नाकारणारी संकुचित मनाची तृप्ती यांच्या वैचारिक विरोधाभासावर हे नाट्य आधारित होते. विकलांग भाऊंची भूमिका श्याम आस्करकर यांनी रसिकांची दाद घेतली. सीमा गोडबोले, स्नेहा अहेर, महेश गोडबोले, विजय अंधारे, आकाश दुधनकर यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. संजय काशीकर यांचे अनुरूप नेपथ्य होते. प्रकाशयोजना मिथुन मित्रा यांनी केली. संगीत अनिल इंदाणे, वेशभूषा कल्याणी तपासे तर निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. आर्ट आॅफ अ‍ॅक्चींगच्या विद्यार्थ्यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर टी. बी. रमणमूर्ती, इन्फ्रा बिल्डकॉनचे संचालक अर्जुन शहाणे, अर्पित शहाणे, अंजली कदम, लेखक गणेश वडोदकर यांचे स्वागत रमण सेनाड आणि श्रद्धा तेलंग व प्रभा देऊस्कर यांनी केले. (प्रतिनिधी)