शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीत येणारे मोदी तिसरे पंतप्रधान

By admin | Updated: April 6, 2017 02:09 IST

समस्त शोषित, वंचितांची प्रेरणा, ऊर्जा आणि क्रांतिभूमी असलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ तारखेला भेट देणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी व मनमोहन सिंह यांनीही दिली होती भेट आनंद डेकाटे   नागपूर समस्त शोषित, वंचितांची प्रेरणा, ऊर्जा आणि क्रांतिभूमी असलेल्या दीक्षाभूमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ तारखेला भेट देणार आहेत. दीक्षाभूमीला भेट देणारे ते तिसरे पंतप्रधान असतील. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला आहे. नागपुरात त्यांचे विविध कार्यक्रम असले तरी खास दीक्षाभूमीसाठीच ते नागपुरात येत आहेत, हे विशेष. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली तर डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली पंतप्रधान असताना दीक्षाभूमीला भेट देऊन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते. याशिवाय उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, रामविलास पासवान, सीताराम येचुरी, सुषमा स्वराज, सत्यनारायण जटीया, चौधरी चुन्नीलाला, सोनिया गांधी, राजीव गांधी, बंगारू लक्ष्मण, डॉ. पद्म सिंह पाटील, एस. एम. कृष्णा, अजित जोगी या राजकीय व्यक्तींसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अशोक सिंघल, ज्योतिष पीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, स्वामी सत्यानंद, प्रसिद्ध निर्माते डॉ. जब्बार पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दीक्षाभूमीला भेटी दिल्या आहेत. सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २७ आॅगस्ट २००० साली दीक्षाभूमीला भेट दिली होती. डॉ. मनमोहन सिंह यांनी १ जुलै २००६ साली भेट दिली. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीच्या व्हीजीट बुकमध्ये लिहिलेला संदेश आजही सांभाळून ठेवण्यात आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदीमध्ये केवळ एका ओळीत लिहिलेला ‘सामाजिक न्याय के बिना स्वतंत्रता अधुरी है.’ हा संदेश ऐतिहासिक असाच आहे. डॉ. मनमोहन सिंह यांनी सुद्धा इंग्रजीमध्ये अतिशय थोडक्यात पण मार्गदर्शक असा संदेश लिहिला आहे. (प्रतिनिधी)