Corona Virus in Nagpur; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल 'फिव्हर क्लिनिक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:00 AM2020-05-25T07:00:00+5:302020-05-25T07:00:07+5:30

या महामारीच्या काळात दिवसरात्र बंदोबस्तात तैनात पोलिसांमध्येही भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर पोलीस विभागातर्फे करचार्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोबाईल 'पोलीस फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे.

Mobile 'fever fever clinic' for police personnel | Corona Virus in Nagpur; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल 'फिव्हर क्लिनिक'

Corona Virus in Nagpur; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल 'फिव्हर क्लिनिक'

Next
ठळक मुद्देसर्व पोलीस ठाणे ‘कव्हर’ होणार१९०० च्यावर पोलिसांची तपासणी

निशांत वानखेडे
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसात १२०० च्यावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातले डझनभर कर्मचारी दगावले आहेत. त्यामुळे या महामारीच्या काळात दिवसरात्र बंदोबस्तात तैनात पोलिसांमध्येही भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर पोलीस विभागातर्फे करचार्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोबाईल 'पोलीस फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १९३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

पोलीस विभागाच्या पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी लोकमतशी बोलताना या उपक्रमाची माहिती दिली. राज्यात पोलीस कर्मचारी कोविडचे बळी पडत असताना नागपूर शहरातही ६ सीआरपीएफच्या जवनांसह आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. ही परिस्थिती लक्षात घेत पोलीस विभागातर्फे फिव्हर क्लिनिकची सुरुवात करण्यात आली. आयएमएच्या सहकार्याने दोन टीम तयार करण्यात आल्या. प्रतापनगर पोलीस स्टेशनपासून याची सुरुवात झाली. या काही दिवसात शहरातील ११ पोलीस स्टेशनमध्ये तसेच कंट्रोल रूमसह १९३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ठरलेल्या पोलीस स्टेशनला पूर्वसूचना देऊन दुपारी १ ते ४ या काळात टीम त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपास करते. तापमान स्क्रिनिंग आणि आॅक्सिजन लेवल तपासण्यात आला. कोविडसदृश्य लक्षण आढळलेल्या तिघांची चाचणी करण्यात आली. मात्र ते सर्व निगेटिव्ह आढळल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. लवकरच सर्व पोलीस स्टेशन कव्हर करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

८५०० जवानांना औषध वितरण
नागपूर पोलीस तसेच एसआरपीएफ व सीआरपीएफच्या जवळपास ८५०० जवानांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, आर्सेनिक, कॅनफर आदी गोळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयसीएमआरच्या डिशनिर्देशानुसार पोलीस जवानांना ही औषध देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस रुग्णालयात कोविड वॉर्ड तयार
कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तशी परिस्थिती आल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारात अडचणी येऊ नये म्हणून पोलीस मुख्यालय, झिंगबाई टाकळी येथील पोलीस रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करण्यात आला आहे. ४० बेडच्या या रुग्णालयात १६ बेडचे कोविड वॉर्ड आयसीयु, व्हेंटिलेटरसह सज्ज करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title: Mobile 'fever fever clinic' for police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.