शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’

By admin | Updated: January 7, 2015 00:58 IST

रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह,

संदीप जी. एन्टरटेनर्स : नृत्य आणि गीतांचे सादरीकरण नागपूर : रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. संदीप जी. एन्टरटेनर्सतर्फे आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नीलिमा गावंडे यांची होती. यात धनराज राऊत, शकिल कुरेशी, शमीम काझी, मो. सलिम, शाहिद कुरेशी, सागर मधुमटके, रंजना कनोजिया, रचना खांडेकर, नीलिमा गावंडे या गायकांचा सहभाग होता. हिंदी चित्रपट गीतांच्या सुवर्णयुगातील या लखलखत्या त्रिरत्नांच्या वैविध्यपूर्ण गीतांची ही आनंददायी अनुभूती होती. गीतांची एकूणच निवड श्रोत्यांच्या मनातील भावना प्रकट करणारी होती. धनराज यांनी सादर केलेल्या ‘देखा है तेरी आँखो मे..’ गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘बडी सुनी है ये जिंदगी.., बिते हुए लम्हे किसके साथ तो होगे..., सारे शहर मे आप सा कोई नही..., चाहुंगा मै तुझे सांज सवेरे..., मुसाफिर हुं यारो..., चला भी आजा...’ आदी गीतांसह काही युगल गीतांचेही तयारीने सादरीकरण करण्यात आले. यात ‘आज की मुलाकात बस इतनी..., लेकर हम दिवाना दिल..., कोरा कागज था मन मेरा...’ आदी गीते रचना, नीलिमा, सागर आणि मो. सलिम यांनी सादर करून रसिकांची दाद घेतली. कार्यक्रमात काही गीतांवर नृत्याचेही सादरीकरण करण्यात आले. सागर मधुमटके यांनी किशोरकुमार मिडलेचे केलेले सादरीकरण रसिकांची दाद घेणारे होते. अब्दूल जहीर यांचे संगीत संयोजन होते. मो. सलिम आणि शाहिद कुरेशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. स्थानिक वादकांनी सुयोग्य साथसंगत केली. कार्यक्रमाला सुप्रिया दास, अनिल बोबडे, सुनील भुते प्रामुख्याने उपस्थित होते. अतिथींचे स्वागत नीलिमा गावंडे आणि संदीप गावंडे यांनी केले. (प्रतिनिधी)