शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे मिशन अतिक्रमण

By admin | Updated: May 20, 2015 02:45 IST

सीताबर्डीतील काही व्यापाऱ्यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व राजकीय नेत्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा पथकावर कोणताही परिणाम झाला नाही.

अतिक्रमणावर लाठी : राजकीय हस्तक्षेपही फेल नागपूर : सीताबर्डीतील काही व्यापाऱ्यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व राजकीय नेत्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा पथकावर कोणताही परिणाम झाला नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने प्रशासनाने अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतल्याची माहिती अधिकारी व्यापाऱ्यांना देत होते. परंतु यामुळे व्यापाऱ्यांचे समाधान झाले नाही. पथकाने कशाचीही पर्वा न करता पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू ठेवली. व्हेरायटी चौक ते महाराजबाग रोड, सीताबर्डी मुख्य मार्गाने लोखंडी पुलापर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने दुकानासमोरील अतिक्रमण करून उभारलेले शेड, होर्डिग्ज व बोर्ड हटविले जात होते. दुपारी १२.३० पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ६.३० पर्यत राबविण्यात आली. परंतु दिवसभर व्यापाऱ्यांचा विरोध सुरू होता. त्यामुळे विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस सौम्य लाठीमार करीत होते. कारवाईला विरोध करणाऱ्या ८ -१० व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. व्यापारी व पोलिसांचा लपंडाव दिवसभर सुरू होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या कारवाईवर अनेक व्यापारी नाराजी व्यक्त करीत होते. परंतु याचा कारवाईवर कोणताही परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)कारवाईच्या नावाखाली अतिरेक : व्यापाऱ्यांचा आरोप बांधकाम वैध असतानाही पथकाकडून तोडण्यात आल्याचा आरोप काही दुकानदारांनी केला. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या पापे ज्यूस सेंटरचे मालक विनित अरोरा व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली. गेल्या ४० वर्षापूर्वीचे बांधकाम आहे. आयआरडीपी अंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी अतिक्रमण नसल्याने बांधकाम तोडले नव्हते. आमच्याकडे दुकानाची कायदेशीर कागपत्रे आहेत. त्यानंतरही बांधकाम तोडण्यात आले. दुकानातील सामान व फ्रीजची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केली. विनित अरोरा यांना पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. १९४७ पूर्वीचे दुकान तोडले४सीताबडीं भागातील मोदी न. ३ येथे दत्तात्रय इंगळे यांचे १९४७ पूर्वीचे फुलांचे दुकान आहे. अतिक्रमण पथकाने मंगळवारी तोडले. या संदर्भात मनपाकडून नोटीस वा पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. दुकान मालकीच्या जागेवर आहे. अतिक्रमण नाही. धंतोली झोनला ४ मे २०१५ रोजी दुकानाची कागदपत्रे सादर केली आहे. मनपाचा दरवर्षी कर भरतो. त्यानंतरही दुकान पाडल्याची व्यथा दत्तात्रय इंगळे यांनी मांडली.१३ धार्मिक स्थळे हटविलीउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यावरील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाती घेतली आहे. मंगळवारी नेहरूनगर झोन अंतर्गत येणारी १३ धार्मिक स्थळे हटविण्यात आली. यात सक्करदरा पोलीस स्टेशन जवळील नागोबा मंदिर, भांडेप्लॉट येथील नागोबा मंदिर, उमरेड रोड ते आयुर्वेदिक कॉलेज मार्गावरील ताजुद्दीन बाबा यांचे तैलचित्र व टीनाचे शेड, ओमनगर येथील नागोबा मंदिर, ओमनगर येथील पाचफणी मंदिर, नेहरुनगर हिमालय बार जवळील गणेश मंदिर, अक्षय भवन येथील हनुमान मंदिर, सुदामपुरी येथील नागोबा मंदिर, नेहरूनगर गार्डनजवळील गणेश मंदिर, हिमालय बार जवळील शिवनाग मंदिर, नेहरुनगर हनुमान मंदिर, ओमनगर येथील हनुमान मंदिर आदींचा यात समावेश आहे. झोनचे सहाय्यक आयुक्त महेश मोराणे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.१२५ दुकानांवर कारवाईव्हेरायटी चौक ते सीताबर्डी मुख्य बाजाराकडून लोखडी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले. व्हेरायटी चौकातील पापे ज्युस कॉर्नर, महराष्ट्र एम्पोरियम, यौकर शुज, बॉम्बेवाला रेडिमेड गारमेन्ट, खानदान ड्रेसेस, पारेख ज्वेलर्स, खादीम शुज, नागपूर हातमाग सोसायटी, दास ज्वेलर्स, दिनशा आईस्क्रीम, सिटी फॅशन, कुनाल साडीवाला, आदी दुकानासमोरील ओटे , नामफलक हटविण्यात आले. तसेच व्हेरायटी चौक ते महाराज बाग चौकादरम्यानच्या मार्गावरील कावेरी बार, मोतीमहल भोजनालय, नीलम स्टुडिओ, गणेश रेस्टारंन्ट, जयभोले भोजनालय, टीटोज रेस्टरंन्ट आदींचे शेड व ओटे हटविण्यात आले. आयुक्तांची भेटमनपा आयुक्त श्रावण हडीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रमोद भुसारी, धंतोली झोनचे सहायक आयुक्त सुभाचन्द्र जयदेव, अतिक्रमण अधीक्षक अरुण पिपुरडे, उप अभियंता अनिल कडू, पोलीस निरीक्षक वेरणेकर, मनपाचे ५० कर्मचारी व अधिकारी, पोलिसांचा ताफा तीन पोलीस व्हॅन, जेसीबी, ट्रक, विद्युत गाडी असा फौजफाटा होता.