शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

‘कमिशन’साठीच ऊर्जा मंत्रालयाकडून कोळशाची इंडोनेशियातून आयात : हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 13:51 IST

यूपीए सरकारचे नेते उद्योजकांच्या फायद्यासाठीच काम करायचे असा आरोपदेखील अहीर यांनी केला.

ठळक मुद्देपूर्व विदर्भातील खाणींशी करार का नाही ?

नागपूर : राज्यातील कोळसा तुटवड्याच्या मुद्द्यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाविकास आघाडी शासनावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. मुळात कोळशासंदर्भात राज्याचा नियोजनशून्य कारभार आहे. वेकोलीच्या अंतर्गत अनेक खाणींशी करार केला तर महाजेनको व ऊर्जा मंत्रालयाला सहज स्वस्त दरात कोळसा मिळेल. परंतु, ऊर्जा मंत्रालयाची नियत बरोबर नसून केवळ कमिशन खाण्यासाठी विदेशातून जास्त दराने कोळसा मागविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.

कोळशाच्या मुद्द्यावर राज्य शासनाने मोठी चूक केली आहे. वेकोलीतील अनेक खाणीत कोळसा उपलब्ध आहे. बल्लारपूर व जवळच्या खाणींचे उत्पादन तर चार लाख मिलियन टनांहून अधिक आहे. त्यांचा दर २३०० ते २६०० इतका आहे. मात्र, ऊर्जा मंत्रालय इंडोनेशियातून चौपट दराने कोळसा आणत आहे. यातूनच त्यांची नियत बरोबर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे अहीर म्हणाले. देशात २०१४ च्या अगोदर कोळशाचे उत्पादन ५०० मिलियन टन इतके होते. आता हा आकडा ३५ टक्क्यांनी वाढून ६७७ मिलियन टनांवर पोहोचला आहे. देशात कोळशाचे उत्पादन वाढले व उद्योगदेखील वाढले आहे, असा दावा अहीर यांनी केला.

यूपीए सरकारमुळे देशाचे ५० लाख कोटींचे नुकसान

यूपीए सरकारचे नेते उद्योजकांच्या फायद्यासाठीच काम करायचे असा आरोपदेखील अहीर यांनी केला. कोळसा घोटाळ्यात १ लाख ८६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे कॅगने स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात हा आकडा फार अधिक होता हे सिद्ध झाले आहे. यूपीए सरकारने फुकटात कोळसा खाणी वाटल्या होत्या. आताच्या केंद्र सरकारने लिलाव प्रक्रिया राबविली. २०१५ सालापासून आतापर्यंत खाणींच्या लिलावातून देशाला सात लाख कोटींहून अधिकचा महसूल मिळाला आहे. कोळसा मंत्रालयाने आणखी १०९ खाणी लिलावासाठी काढल्या आहेत. त्यातून सुमारे ३५ लाख कोटींपर्यंतचा महसूल प्राप्त होईल. यूपीए सरकारने देशाचे ५० लाख कोटींचे नुकसान केले होते, असा दावा अहीर यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणHansraj Ahirहंसराज अहिरVidarbhaविदर्भCoal Shortageकोळसा संकट