शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दुर्लक्षामुळे मिहान मागे पडला : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 01:03 IST

नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.

ठळक मुद्देबाईक रॅली काढून जनसंपर्क

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी हव्या तशा नोकऱ्या नाहीत. स्वयंरोजगाराच्या योजना कौशल्याविना बिनकामाच्या ठरल्या आहेत. नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.गुरुवारी सकाळी ८ वाजता माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून आशिष देशमुख यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचाशुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.सुभाष नगर, त्रिमूर्ती नगर, खामला, सोनेगाव, जयप्रकाश नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, छत्रपती नगर व लगतचा परिसर या रॅलीने पालथा घातला व जनसंपर्क साधला. रॅलीमध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे, डॉ. आयुश्री देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी देशमुख पुढे म्हणाले, नवीन गुंतवणूक नाही त्यामुळे बेरोजगार युवक तसेच व्यवसाय, उद्योग, आय टी कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळाली नाही. गरजू महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा रोजगारासंबंधी योजनांचा अभाव आहे. उद्योगांची या सरकारने वाट लावली आहे. सरकारी तिजोरी रिकामी आहे.नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या फार दूर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. त्यामुळे महागाई वाढली आहे. जीएसटी, नोटाबंदी व आर्थिक मंदी ही सरकारने लादलेली समस्या आहे. व्यापारी भरडला जात आहे. लोकांना हातचा रोजगार गमवावा लागत आहे.काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. बेरोजगारी, उद्योगधंदे, महागाई यामुळे जनता त्रासली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम