मेट्रो रेल्वेच्या कर्जावर १० ला शिक्कामोर्तब

By Admin | Updated: April 6, 2016 03:06 IST2016-04-06T03:06:50+5:302016-04-06T03:06:50+5:30

मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुगीचे दिवस आले असून बांधकामाला वेग आला आहे. पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे.

Metro rail loan loan on 10th September | मेट्रो रेल्वेच्या कर्जावर १० ला शिक्कामोर्तब

मेट्रो रेल्वेच्या कर्जावर १० ला शिक्कामोर्तब

फडणवीस, गडकरी यांच्या उपस्थितीत होणार ‘फॉलोअप’ करार
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुगीचे दिवस आले असून बांधकामाला वेग आला आहे. पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे. विदेशी कर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या एकूण रकमेवर नागपुरात हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये १० एप्रिलला सकाळी ९ वाजता शिक्कामोर्तब होणार आहे. ‘फॉलोअप’ कर्ज करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. ३७५० कोटी रुपयांच्या कर्ज करारावर केएफडब्ल्यू आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी स्वाक्षरी करतील.
जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जवळपास ३७५० कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. यासंदर्भात १ एप्रिलला दिल्ली येथे एका छोटेखानी समारंभात डिपार्टमेंट आॅफ एकॉनॉमिकल अफेयर्स आणि केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली होती. आता अंतिम करार १० एप्रिलला नागपुरात होणार आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येत आहे. यातील ३७५० कोटी रुपये कर्ज स्वरुपात मिळणार आहे. यात नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, वीज पुरवठा, ट्रॅक्शन, बांधकाम आदी कामे पूर्ण करण्यात येतील. कर्ज स्वरुपात मिळणाऱ्या रकमेची परतफेड २० वर्षांत करण्यात येणार आहे. यात पहिले पाच वर्ष केवळ व्याज फेडायचे आहे. व्याजदर ०.६ टक्के राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Metro rail loan loan on 10th September