शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची पद्धतच बदलली; ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:07 IST

कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे.

ठळक मुद्देकॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन संचालकांचा पुढाकार

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे. लग्न समारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची नियमावली केली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले असून नागपुरात १०० पेक्षा जास्त कॅटरर्सने ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका घातला आहे. लग्न पुढे न ढकलता ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा अनेकांनी अवलंब केला आहे.लग्नसमारंभ, वाढदिवस आणि लहानमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मंगल कार्यालयाच्या संचालकांनी पॅकेज तयार केले आहेत. ठराविक पॅकेजमध्ये ५० जणांचे मिठाईसह रुचकर जेवण, जागेची उपलब्धता, हॉलचे सॅनिटायझेशन, हॅण्डग्लोव्हजची उपलब्धता, सजावट आदींचा पॅकेजमध्ये समावेश आहे. ५० पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगीसाठी कुणीही पुढे येत नसल्याची माहिती आहे.खंगार कॅटरर्सचे चंद्रकांत खंगार म्हणाले, लग्नसमारंभ आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी अनेक मंगल कार्यालय आणि लॉन संचालकांशी बोलणी केली आहे. ५० जणांसाठी संपूर्ण सुविधेसह विशेष पॅकेज तयार केले आहे. पॅकेज तयार करून महिना झाला आहे. पण सध्या कुणीही ग्राहक आले नाही. लग्नसमारंभाच्या तारखा आता नाहीत. दिवाळीत साजरे होतील. जगदंबा कॅटरर्सचे बंडू राऊत म्हणाले, मार्च ते मे महिन्याचा लग्नाचा हंगाम कोरडा गेला आहे. थोडक्यात कार्यक्रम साजरे करण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. तीन महिन्यात केवळ ९ हजाराचे उत्पन्न झाले.

मानसिकता बदलणे गरजेचेनागपुरात लग्नापूर्वी साक्षगंध आणि हळदीचे कार्यक्रम तसेच वाढदिवस असले तरीही किमान २५० ते ३०० जणांची उपस्थिती असते. नातेवाईक आणि मित्रमंडळी ५०० च्या आसपास असतात. त्यामुळे ५० जणांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम कसे साजरे करणार, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरही प्रशासन २०० ते ३०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देईल. अशा स्थितीतही नागपूरकरांचे कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनामुळे कार्यक्रम आयोजनाचे स्वरुप बदलल्याचा सूर नागपूरकरांनी काढला.लग्नासाठी नियमकेवळ ५० जणांच्याच उपस्थितीत होणार लग्न५० पेक्षा अधिक लोक आढळल्यास, लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई होणारलग्न समारंभात सॅनिटायझेशन व फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस