मनोरुग्णालयात परिचारिकेचा मानसिक छळ

By Admin | Updated: May 20, 2014 00:56 IST2014-05-20T00:56:38+5:302014-05-20T00:56:38+5:30

प्रादेशिक मनोरुग्णालयात एका अधिकार्‍याने परिचारिकेचा मानसिक छळ केल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक यांच्याकडे केली आहे.

Mental harassment of nurse in psychiatric hospital | मनोरुग्णालयात परिचारिकेचा मानसिक छळ

मनोरुग्णालयात परिचारिकेचा मानसिक छळ

चौकशी समिती स्थापन : अधीक्षक म्हणतात, असे काहीच नाही

नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात एका अधिकार्‍याने परिचारिकेचा मानसिक छळ केल्याची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक यांच्याकडे केली आहे. त्यानुसार रुग्णालयात चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी यासंदर्भात काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मनोरुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ परिचारिका यांचा मुलगा दहावीची परीक्षा देत असताना त्यांना सुट्या हव्या होत्या. परंतु प्रभारी मेट्रन्स असलेले निरंजन फुलझेले यांनी सुट्या नाकारल्या. यापूर्वीही परिचारिकेचा मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिचारिकेने या संदर्भाची एक तक्रार आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार आणि नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. वसंत झारे यांच्याकडे केली. त्यानुसार रुग्णालयात डॉ. रंजना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. आज सोमवारपासून या समितीने चौकशी सुरू केली. यासंदर्भात डॉ. मडावी यांना विचारल्यावर त्यांनी कोणतीही चौकशी सुरू नसून, असे काहीच झाले नसल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mental harassment of nurse in psychiatric hospital