शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय जागांचा चेंडू केंद्र शासनाच्या कोर्टात

By admin | Updated: July 3, 2014 00:51 IST

यवतमाळ व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १५० जागा कायम ठेवायच्या की, त्यातून ५० जागांची कपात करायची, यावर केंद्र

हायकोर्ट : १५ जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देशनागपूर : यवतमाळ व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १५० जागा कायम ठेवायच्या की, त्यातून ५० जागांची कपात करायची, यावर केंद्र शासनाने १५ जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणावर आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी दोन्ही महाविद्यालयांमधील उणिवा दूर करण्यासंदर्भात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु प्रतिज्ञापत्रातील माहितीमुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. दोन्ही महाविद्यालयांतील उणिवा निर्धारित कालावधीत दूर करण्याची शासनाची इच्छा असल्याची खात्री प्रतिज्ञापत्रावरून पटत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशामुळे नागपुरातील मेयो (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) आणि अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवून मिळाल्या होत्या. यामुळे दोन्ही महाविद्यालयात १५० जागा झाल्या होत्या. केंद्र शासनाने १० वर्षे पूर्ण झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ५० जागा वाढवून देण्याचा निर्णय केवळ एक वर्षासाठी घेतला होता. यामुळे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी मेडिकल कौन्सिलने पुन्हा महाविद्यालयांचे निरीक्षण केले. त्यात आवश्यक सुविधांचा अभाव आढळून आल्यामुळे कौन्सिलने गेल्या ७ मे रोजी केंद्र शासनाला पत्र लिहून अकोला आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५० जागा कमी करण्याची व दोन्ही महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याची शिफारस केली आहे. या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात कौन्सिलच्या शिफारशीवर पूर्वपरवानगीशिवाय कोणताही निर्णय घेण्यास केंद्र शासनाला मनाई केली होती.आजच्या आदेशात न्यायालयाने पूर्वीच्या घडामोडींचाही उल्लेख केला. मेयोमधील एमबीबीएसच्या जागा व सोयीसुविधांचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मेयोच्या विकासाचा प्रकल्प डिसेंबर-२०१५ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. यामुळे राज्य शासन येणाऱ्या काळात निधी उपलब्ध करून देते किंवा नाही, हे पाहण्यासाठी विषय प्रलंबित ठेवला होता. आता अकोला व यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु शासनाच्या प्रतिज्ञापत्रात काहीच ठोस भूमिका दिसून येत नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. प्रकरणावरील पुढील सुनावणी १६ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. महाविद्यालयांच्या बाजूने न्यायालयीन मित्र अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा, तर शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)