शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये ‘मुन्नाभाई’

By admin | Updated: July 4, 2015 03:02 IST

राहुल (२५) मूळ रा. मूल, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असे पकडलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

स्त्री रोग विभागाच्या वॉर्डात आढळला बोगस डॉक्टर : पाठलाग करून पकडलेराहुल (२५) मूळ रा. मूल, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असे पकडलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. मेडिकलमध्ये गुरुवारपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. ४०० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाल्यामुळे मेडिकल कॉलेजच्या २०० इंटर्नवर रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली. होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ‘बीपीएमटी’ या पॅरामेडिकलचा विद्यार्थी असलेला राहुल हा बोगस डॉक्टर बनून स्त्री रोग विभागाच्या वॉर्ड क्र.२२ मध्ये शिरला. तिथून तो वॉर्डाच्या वऱ्हांड्यात आला. त्याचेवेळी मेडिकलचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रमेश पराते व इतर डॉक्टर त्या भागातून जात असताना त्यांना या बोगस डॉक्टराचा संशय आला. त्यांनी राहुलला जवळ बोलवून विचारणा केली. राहुलच्या गळ्यात ओळखपत्रही होते. डॉ. पराते यांनी अधिक चौकशी केली असता राहुल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय अधिक बळावताच डॉ. पराते यांनी अधीक्षक कक्षाकडे चलण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल पळायला लागला. डॉक्टरांनी आरडाओरड केली. सुरक्षारक्षकांनी त्याचा पाठलाग केला असता नागरिकांनी राहुलला पकडले आणि मेडिकल प्रशासनाच्या स्वाधीन केले. बोगस डॉक्टर पकडल्याची वार्ता मेडिकलमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने लागलीच अजनी पोलिसांना बोलावून बोगस डॉक्टर राहुलला पोलिसांच्या स्वाधीन केले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत मेडिकल प्रशासनाकडून या बोगस डॉक्टराच्या विरोधात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नव्हती.(प्रतिनिधी)इंटर्न मित्राच्या मदतीसाठी बनला ‘डॉक्टर’!पकडलेल्या राहुलची विचारपूस केली असता त्याने मेडिकलमध्ये इंटर्नचा विद्यार्थी असलेला युवराज या विद्यार्थ्याचा मित्र असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, संपामुळे गुरुवारपासून युवराजची ड्युटी वॉर्डात लावण्यात आली होती. शुक्रवारी काही तास आराम करावा यासाठी त्याने राहुलला अ‍ॅप्रॉन घालून वॉर्डात जाण्यास सांगितले आणि हे प्रकरण घडले. युवराजचे इतर इंटर्न मित्र युवराजची ही पहिलीच चूक असल्याचे सांगून त्याला सोडण्याची विनंती करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत अधिष्ठाता कार्यालयासमोर ठाण मांडून होते.