शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या इंटर्नला मारहाण : अधिष्ठात्यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:42 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देतक्रारीसाठी नकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु मारहाण झालेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात किंवा महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यास इंटर्न तयार नाही. यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या इंटर्न हा मंगळवारी रात्री बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागातून आपले काम संपवून ‘ओपीडी’ समोर ठेवलेल्या वाहनाकडे जात होता. याच वेळी एका अज्ञात इसमाने त्याला नेत्ररोग विभागाकडे एक रुग्ण पडून असल्याचे सांगून घेऊन गेला. तिथे आधीच एका व्यक्तीने इंटर्नच्या मानेवर चाकू लावला. त्याला ई-लायब्ररीच्या मागील भागात घेऊन गेले. तिथे आणखी दोन अनोळखी इसम होते. त्यांनी इंटर्नला मारहाण करून त्यांच्याकडील तीन हजार रुपये हिसकावले. हातावर ब्लेडने वार केल्याचेही सांगण्यात येते. घाबरलेल्या इंटर्नने रुग्णालयात मलमपट्टी करून वसतिगृह गाठले. ही माहिती इतरांना कळताच खळबळ उडाली. याची माहिती अजनी पोलिसांना देण्यात आली. परंतु तक्रार नसल्याने त्यांना पुढे काही करता आले नाही. याची गंभीर दखल घेत अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी चौकशी समिती स्थापन केली. समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना घडत असताना सुरक्षा रक्षक कुठे होते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय