शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर मुदतवाढीचा वाद कोर्टात

By admin | Updated: July 3, 2014 00:58 IST

राज्य शासनाने विद्यमान महापौर व नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा मंजूर केला आहे. याविरुद्धच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे ७ जुलै रोजी निर्णय

सोमवारी निर्णय: कायद्याविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी पूर्णनागपूर : राज्य शासनाने विद्यमान महापौर व नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा मंजूर केला आहे. याविरुद्धच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातर्फे ७ जुलै रोजी निर्णय देण्यात येणार आहे. प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.महापौर व नगराध्यक्षपदाची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या काळातच आली होती. विधानसभा निवडणुकीत पोलीस, प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येत आवश्यकता भासत असते. यामुळे शासनाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विद्यमान महापौर व नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा मंजूर केला आहे. याविरुद्ध नांदुरा येथील कोकिळाबाई झांबरे व इतरांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. विद्यमान महापौर व नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यास नंतर निवडून येणाऱ्या महापौर व नगराध्यक्षांना केवळ दोन वर्षांचा कालावधी मिळेल. महापौर व नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांचा निर्धारित करण्यात आला असून, त्याला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. परिणामी कायदा घटनाबाह्य असल्याचा दावा करून सभागृहात होणाऱ्या निवडणुकीमुळे कायदा व सुव्यवस्था कशी बिघडेल, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कायद्यातून उपाध्यक्ष व उपमहापौराला वगळण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या विनंतीवरून न्यायालयाने या पदांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. ही निवडणूक २६ जून रोजी होणार होती. (प्रतिनिधी)