शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या सासरच्या चौघांना कारावास

By admin | Updated: July 4, 2015 03:11 IST

हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून एका गरोदर विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून अतिरिक्त

नागपूर : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करून एका गरोदर विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने सासरच्या चार जणांना दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पती उदय अरुणराव नलगे (३२), नणंद प्रणाली अरुण नलगे (३१), सासू मंदा अरुण नलगे (५९) आणि सासरे अरुण नारायण नलगे (६०), अशी आरोपींची नावे असून ते सक्करदरा आनंदनगर येथील रहिवासी आहेत. अश्विनी उदय नलगे, असे मृत विवाहितेचे नाव होते. बैतुल येथील चंदा दिवाकर शिंदे यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न २०११ मध्ये उदय नलगे याच्यासोबत झाले होते. लग्नात ३० हजार रुपये हुंडा देण्यात आला होता. संसाराला लागताच पुन्हा हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात होता.तिला जेवण न देता सतत मारहाण केली जात होती. छळाला कंटाळून तिने १० आॅगस्ट २०१२ रोजी ओढणीने छताला बांधून गळफास लावून आत्महत्या केली होती. आई चंदा शिंदे यांच्या तक्रारीवरून २७ आॅगस्ट २०१२ रोजी भादंविच्या ४९८-अ, ३०६, ३०४-ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात केवळ मानसिक व शारीरिक छळाचा गुन्हा सिद्ध झाला. उर्वरित दोन गुन्हे सिद्ध करण्यास सरकार पक्षाला अपयश आले. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत, अजय माहूरकर तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)