शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीने मनपात फिल गुड

By admin | Updated: November 16, 2016 02:35 IST

५०० व १००० रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी गेल्या पाच दिवसात नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात

मनपा तिजोरीत १६.३६ कोटी जमा: नोटा स्वीकारण्याला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढनागपूर : ५०० व १००० रुपयांच्या नोटा चालविण्यासाठी गेल्या पाच दिवसात नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात मालमत्ता कर व पाणी बिलाची तसेच बाजार विभागाची वसुली मिळून १६ कोटी ३६ लाखांची रक्कम जमा केली आहे. यामुळे आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. कर भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या नोटा स्वीकारल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले होते.शुक्रवारी एकाच दिवसात ६ कोटी ३ लाख मालमत्ता कराच्या माध्यमातून जमा झाले होते. त्यानंतरही नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती. मंगळवारी २ कोटी ३ लाखांची वसुली झाली.बाजार विभागाचीही ९० लाखांची वसुली झाली आहे. सुरुवातीला १४ नोव्हेंबरपर्यतच ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या जातील असे जाहीर केले होते. परंतु आता २४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी बँकापुढे रांगा असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. परंतु या नोटामुळे महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होत आहे. (प्रतिनिधी)मुदतवाढीचा नागरिकांनी लाभ घ्यावामालमत्ता कर भरण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्याला २४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना कर भरण्यासाठी या नोटांचा वापर करता येणार आहे. सर्व देयक स्वीकार कें द्रावर बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. मिलिंद मेश्राम,सहायक आयुक्त , महापालिका ओसीडब्ल्यूची २ . ३ लाखांची वसुलीमालमत्ता करासोबतच पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी दहाही झोनमधील ओसीडब्ल्यूच्या कार्यालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसात १६१८८ ग्राहकांनी २ कोटी ३ लाखाची थकबाकी भरली आहे. कर भरण्यासाठी ओसीडब्ल्यूकडून धनादेश, लहान मूल्याच्या नोटा तसेच डेबिट व क्रेडिट कार्डाव्दारे आॅन लाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र बाद झालेल्या नोटांचा वापर अगाऊ बिल भरण्यासाठी करता येणार नाही.