शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दलालांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: March 15, 2015 02:11 IST

पोलीस ठाण्यांमध्ये मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कथित ‘दलालां’वर कठोर कारवाई करा, ...

नागपूर : पोलीस ठाण्यांमध्ये मध्यस्थीसाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कथित ‘दलालां’वर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेला दिले. शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी एकत्रित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.१० मार्च रोजी नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्यास लाच घेताना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. फडणवीस यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के.के. पाठक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी आपल्या वागणुकीतून सर्वसामान्यांच्या मनात निर्भयतेचे व विश्वासाचे वातावरण निर्माण करावे आणि त्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यांमध्ये वाढलेल्या राजकीय दलालांच्या सक्रियतेकडेही लक्ष वेधले. हे दलाल कुठल्याही पक्षांचे असो त्यांना सोडू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अवैध दारुविक्री, सट्टाबाजार, रेती माफियांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भातील इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. बैठकीला सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह इतरही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)