लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटेट) २०२६ ही परीक्षा आता रविवार, २१ जूनऐवजी २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाने ही माहिती दिली.
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणारी ही परीक्षा पूर्वी २१ जून रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी देशभरात नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्याने दोन्ही परीक्षांची अनेक केंद्रे समान असल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाटेटने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, महाटेटचा पेपर क्रमांक १ हा २८ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. तर पेपर क्रमांक २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.दरम्यान, परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट १६ जून ते २८ जून या कालावधीत काढता येणार आहे. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती महाटेट अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Summary : MahaTET exam rescheduled to June 28 due to clash with NEET. The Maharashtra State Examination Council made the announcement, citing scheduling conflicts. Admit cards available online from June 16-28.
Web Summary : नीट परीक्षा के कारण महाटीईटी परीक्षा 28 जून को पुनर्निर्धारित की गई। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने समय-सारणी टकराव का हवाला देते हुए घोषणा की। प्रवेश पत्र 16-28 जून से ऑनलाइन उपलब्ध।