Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:51 AM2019-10-13T00:51:38+5:302019-10-13T00:53:21+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Super Sunday of campaigning: Meeting of Yogi, Baghel | Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा

Maharashtra Assembly Election 2019: आज प्रचाराचा सुपर संडे : योगी, बघेल यांच्या सभा

Next
ठळक मुद्देशक्ती प्रदर्शनावर जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी १३ ऑक्टोबर हा शेवटचा रविवार (सुटीचा दिवस) आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार व पक्षाने याला प्रचाराचा सुपर संडे बनवण्यासाठी कंबर कसली आहे. यात अनेक मोठे नेतेही शहरात सहभागी होतील. भाजपतर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व काँग्रेसकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल हे प्रचार सभांना मार्गदर्शन करतील.
२१ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. त्या दिवशी सोमवार येत आहे. पुढचा रविवार २० तारखेला येत आहे. दोन दिवस अगोदर निवडणूक प्रचार संपत असल्याने उमेदवारांना शांत राहावे लागणार आहे. गेल्या रविवारपर्यंत प्रचाराने जोर धरलेला नव्हता. त्यामुळे उमेदवारांना व पक्षांना प्रचारासाठी केवळ उद्याचा एकच रविवार भेटत आहे. त्यामुळे या रविवारला सुपर संडे करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहेत. अनेकांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. काहींनी मतदारांच्या घरोघरी पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजपचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दक्षिण आणि पश्चिम नागपूरमध्ये जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. त्याचप्रकारे काँग्रेसचे प्रवक्ते संजय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल हे उत्तर नागपूरमध्ये सभेला मार्गदर्शन करतील.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Super Sunday of campaigning: Meeting of Yogi, Baghel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.