शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:33 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून  काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष सहभागी झाले होते.

ठळक मुद्देस्वावलंबीनगर, कामगार कॉलनी, सुभाषनगर भागात पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ गुरुवारी सकाळी स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून  पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष सहभागी झाले होते.यानंतर ही पदयात्रा बंडू सोनी ले आऊट, गोपालनगर, संभाजी चौक, शिवाजी चौक, आयटी पार्क परिसर, दत्त मंदिर परिसर, पठाण ले आऊट, लोखंडेनगर या भागातून फिरली. नागरिकांनी जागोजागी या पत्रयात्रेत सहभागी पदाधिकाऱ्यांची आरती ओवाळून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाची हमी दिली. वयोवृद्ध, भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत आणि नागरिकांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना निवडून द्यावे असे आवाहन करत ही पदयात्रा नियोजित स्थळी पोहोचली. मुख्यमंत्री स्वत: या पदयात्रेत सहभागी झाले नसले तरी जोशी आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांची कमतरता जाणवू दिली नाही.या पदयात्रेत महापौर नंदा जिचकार यांच्यासह मंडल अध्यक्ष रमेश भंडारी, दिलीप दिवे, सोनाली कडू, प्रमोद तभाने, विनायक चमाटे, कैलाश येसने, योगेश थापे, अनूप वर्मा, जयंत पवार, लक्ष्मण भोले, सुनील गोले, राजू वाघ, प्रवीण पाटील, वर्षा रेकवार, सुवर्णा वानखेड़े, अनिता मानकर, ज्योती नाकतोडे, नरेश शेंडे, शैलेश लायसे, सुनील वासनिक, जीतू कांबळे, नंदा मिलमिले, वर्षा मानकर, प्रभाकर मोहोड, राजेश केवाटे, हरिकृष्ण धनविजय, बबन दियेवार, विवेक मेंढी, उमेश कडू, दानी, अंकित दास, शुभम कनोजिया, श्रेयंश शाहू, निर्मला भापकर, सुशीला भोयर, हिरेन बाळबुधे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम