शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Maharashtra Assembly Election 2019 : गाऊंड रिपोर्ट : नागपूर उत्तरमध्ये चुरशीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 8:34 PM

सर्व प्रमुख उमेदवार हे आंबेडकरी चळवळीतील चेहरे असून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर नागपुरात यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे काँग्रेसपुढे बसपा, वंचितचे आव्हान : भरपाईसाठी भाजपचा लागतोय कस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ हा रिपाइंच्या हातून निसटून काँग्रेसकडे गेला, आणि मागच्या निवडणुकीत भाजपने तो काँग्रेसकडून हिसकावून घेतला. बसपाने या मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. मागच्या वेळी बसपा दुसऱ्या क्रमांकावर होता. यंदाही भाजपने डॉ. मिलिंद माने यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत पुन्हा मैदानात उतरले आहेत. तर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे स्वत:च रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे सुद्धा लक्ष लागले आहे. सर्व प्रमुख उमेदवार हे आंबेडकरी चळवळीतील चेहरे असून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर नागपुरात यावेळी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.डॉ. नितीन राऊत हे सलग १५ वर्षे उत्तरमधून निवडून आले. मात्र, २०१४ मध्ये त्यांना मोठा धक्का बसला. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी त्यांना मात दिली. त्यावेळी बसपाच्या हत्तीवर स्वार झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे ५५,१८७ मते घेत दुसºया क्रमांकावर राहिले. राऊत हे तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले. बसपाला संपूर्ण विदर्भातून सर्वाधिक मते या मतदार संघात मिळाली होती. भाजपचे सशक्त संघटन ही डॉ. माने यांची सर्वात जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील भाजपचे स्टार प्रचारक उत्तर नापुरातही प्रचारात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी हे केवळ याच मतदार संघात ८,९१० मतांनी माघारले होते. यापासून वेळीच सावध होत हे नुकसान भरून काढण्यसाठी भाजप कामाला लागली आहे.काँग्रेसने यावेळीही डॉ. नितीन राऊत यांना मैदानात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत राऊत यांचे पक्षातील वजनही आहे. मात्र, काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी राऊत यांच्यासाठी मारक आहे. बसपानेही या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना मैदानात उतरवून व त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी जाहीर सभा घेऊन आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे संपूर्ण कॅडर सक्रिय झाले आहे. महापालिकेत बसपाचे १० नगरसेवक आहेत. ते सर्व उत्तर नागपुरातील असल्याचा फायदा बसपाला मिळताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीने विनय भांगे यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेत ‘वंचित’च्या उमेदवाराने ६,५७३ मते घेतली होती. आता आपली ताकद आणखी वाढल्याचा त्यांचा दावा आहे. याशिवाय एमआयएम, आंबेडकराईट्स पार्टी व अपक्षासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. एकूणच नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी परिस्थिती आहे.एकूण उमेदवार - १४एकूण मतदार - ३,८४, ५९४पुरुष मतदार - १,९५,३९५महिला मतदार - १,८९, १५९इतर मतदार - ४०

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-north-acनागपूर उत्तर