शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो : प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 22:15 IST

नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या सौंदर्यात भर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ट्रान्सफॉर्मिंग नागपूर म्हणताना आपल्या शहरात कुठले बदल होतील याची उत्सुकता प्रत्येकाला लागून होती. याच अनुषंगाने महामेट्रो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थापत्य तज्ज्ञांकडून प्रत्येक महत्त्वाच्या इमारती, मार्गिका व स्टेशनचे डिझाईन तयार करून प्रसिद्ध केले होते. स्वप्नपूर्तीच्या या प्रवासाची चार वर्षे पूर्ण होतानाच नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे.प्रस्तावित डिझाईन प्रत्यक्षात साकारल्यानंतर सत्य आणि कल्पना शेजारी ठेवल्यावर यातील फरक ठळकपणे लक्षात येताच त्याच अनुषंगाने संलग्नित चित्र हे व्हेरायटी चौकातल्या मार्गिकेचे असून त्यात शहराची हृदयलाईन समजल्या जाणाऱ्या शहीद गोवारी उड्डाण पुलावरून शहराचा मान ठरलेली माझी मेट्रो क्रॉस करीत असल्याचे चित्र साकारले गेले होते. हे चित्र सुंदर होते, मात्र हे चित्र प्रत्यक्षात मूर्त रूपात उतरल्यानंतर व्हेरायटी चौक येथील कार्य हुबेहूब उतरले किंबहुना चित्रापेक्षाही अधिक अत्याधुनिक व आकर्षक असल्याचे निदर्शनास आले आहे.महामेट्रोद्वारे निर्माण होणाऱ्या स्थानकांच्या इमारती, पिलर, पूल, डबल डेकर यांच्या डिझाईन तुलनेने भिन्न असून त्यावर होणारी रंगरंगोटी आणि प्रकाशयोजनेमुळे फक्त तेवढा परिसरच नाही तर एकंदरीतच शहराचे रूप सुंदर होऊ लागले आहे. बाहेरून नागपूर शहराकडे येणारे व्यापारी आणि पर्यटकांसाठी हे शहर आता आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रबळ झाल्याने पुढल्या काही काळात येथील व्यवसायालाही अधिक सुगीचे दिवस येण्याची अपेक्षा आहे. सीताबर्डी परिसरात नागपूर मेट्रोचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर स्टील गर्डर ब्रिजचे काम सुरक्षिततेची काळजी घेत पूर्ण केले. या पुलाचे प्रस्तावित डिझाईन जसे होते त्याहून अधिक प्रत्यक्षात बांधकामानंतरचा पूल आकर्षक आणि देखणा झाला आहे. रस्त्यापासून १८.५ मी. उंच असलेल्या या पुलावरून मेट्रो जात असताना पाहणे प्रवाशांसाठी आनंदाचे ठरत असून या चित्राने शहराचे सौंदर्य अधिकच वाढले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर