‘मॅडम’ आल्या ‘अंबर’ दिव्यात गेल्या ऑटोतून

By Admin | Updated: May 28, 2014 01:00 IST2014-05-28T01:00:16+5:302014-05-28T01:00:16+5:30

गाडीवर लाल दिवा म्हणजे अनेक अधिकार्‍यांसाठी प्रतिष्ठेची बाब . यासाठी ते अनेकदा नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु याच आग्रहामुळे काही वेळा त्यांच्यावर

'Madam' came in 'Amber' in the light of the autos | ‘मॅडम’ आल्या ‘अंबर’ दिव्यात गेल्या ऑटोतून

‘मॅडम’ आल्या ‘अंबर’ दिव्यात गेल्या ऑटोतून

राष्ट्रीय सफाई आयोगाच्या सदस्यांवर नामुष्की : अंबरदिव्यामुळे सोडली गाडीअंबरदिव्याचा मोह नडला. अंबर दिव्याच्या गाडीतून आलेल्या मॅडमना चक्क ऑटोरिक्षातून गुपचूपपणे काढता पाय घ्यावा लागला. लोकमतप्रतिनिधीने गाठले. पदाला अंबर दिवा आहे का, या प्रश्नावर त्यांनी, दिल्लीत लाल दिवा आहे, येथे नवीन नियमानुसार अंबर दिवा दिला असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांना याचा संशय आला. त्या वाहनात बसायला जात असताना त्यांना थांबविले. अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ते घुटमळत राहिले. प्रतिनिधी आणि छायाचित्रकाराच्या जाण्याची वाट पाहत बसले, परंतु ते जात नसल्याचे पाहत स्वत:च मागच्या दाराने पळ काढला. रुग्णालयाच्या एका कर्मचार्‍याने त्या ऑटोतून गेल्याचे सांगितले.

सुमेध वाघमारे - नागपूर

गाडीवर लाल दिवा म्हणजे अनेक अधिकार्‍यांसाठी प्रतिष्ठेची बाब . यासाठी ते अनेकदा नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु याच आग्रहामुळे काही वेळा त्यांच्यावर नामुष्कीची वेळ देखील येते. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महोतो यांना नागपुरात

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज मंगळवारी डॉ. महोतो नागपुरात आल्या आहेत. इनोव्हा वाहनातून (एम.एच. ३१ सीए ४४१९) त्या मेयो रुग्णालयात पोहचल्या. या वाहनाच्या समोरच्या टपावर फ्लॅशरसह अंबर दिवा लागला होता. दुपारी ३.३0 वाजता मेयोच्या अधिष्ठातांसोबत त्यांनी बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर त्या जाण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयाच्या खाली पोर्चजवळ आल्या. येथे त्यांना

दरम्यान ज्या वाहनातून डॉ. महतो आल्या होत्या त्या वाहनाच्या ड्रायव्हरने अंबर दिवा काढला आणि तोही पसार झाला.

मेयो रुग्णालयातील सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या अंबर दिव्यातून आल्या खर्‍या, पण त्याच समस्यांत सापडल्या. नियम सांगणारे आम्हीच आणि नियम मोडणारेही आम्हीच, या तोर्‍यात शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांची वागणूक आहे. न्यायालयाचे वाहनांवरील दिव्यांबाबत कठोर आदेश असताना, काही अधिकारी मात्र, दिव्याचा सर्रास गैरवापर करीत आहेत. यामुळे त्यांना रोखणार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: 'Madam' came in 'Amber' in the light of the autos