शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी सबसिडीचा फायदा फक्त गरजूंनाच मिळावा

By admin | Updated: November 23, 2014 00:35 IST

देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे.

उद्योजक नितीन खारा यांचे आवाहन : सबसिडी नाकारलीनागपूर : देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे. पत्रपरिषदेत खारा यांनी सांगितले की, मुलांना ४० ते ५० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन देणारे लोक शासनाच्या ५०० रुपयांच्या सबसिडीचा फायदा घेतात. समाजात असाही एक वर्ग आहे की, सिनेमाचे २५० रुपयांचे तिकीट खरेदी करतात आणि सोबतच २५० रुपयांचे पॉपकॉर्न खातात, पण ५०० रुपयांची सबसिडी सोडत नाहीत. एलपीजी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सिलिंडरच्या भावातील चढ-उताराचा प्रत्येकाला त्रास होतो. काही लोक असेही आहेत की, ज्यांना सबसिडीचा फायदा मिळत नाही. जे फायदा घेतात, त्यांच्यामुळे राष्ट्रीय बजेटवर परिणाम पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन सबसिडी परत केली आहे. यापुढे घरगुती सबसिडीचा फायदा घेणार नाही. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. डीलरला सबसिडी परत करण्याचा अर्ज देऊन तेल कंपनीच्या वेबसाईटवर आपल्या मागणीची नोंद केली आहे. हे छोटेसे पाऊल, पण महत्त्वपूर्ण आणि देशाच्या विकासात योगदान ठरणारे आहे. खारा म्हणाले की, देशात आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवर परकीय चलन खर्च होते. गरज नसलेल्यांना सबसिडी मिळत आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. सर्व बाबींचा विचार करून सबसिडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे अनेक लोक सबसिडी परत करतील, असा विश्वास नितीन खारा यांनी व्यक्त केला.(वाणिज्य प्रतिनिधी)