शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या दीपोत्सवला सर्वाधिक पसंती

By admin | Updated: October 18, 2014 03:41 IST

दिवाळीला लाडू, चकली, करंजी या फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंकांसोबत इतर वाचनीय पुस्तकांचा फराळ देण्यासाठी शंकरनगर चौक येथील

नागपूर : दिवाळीला लाडू, चकली, करंजी या फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंकांसोबत इतर वाचनीय पुस्तकांचा फराळ देण्यासाठी शंकरनगर चौक येथील महाराणा प्रताप स्मृती सभागृहात ‘दिवाळी ग्रंथ महोत्सव’ाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोकमतच्या दीपोत्सवला सर्वाधिक पसंती मिळत आहे. मराठी दिवाळी अंकांना फार मोठी परंपरा आहे. उत्कृष्ट दिवाळी अंक प्रसिद्ध करणे ही अभिमानाची बाब मानली जाते. दरवर्षी चांगला दिवाळी अंक कोणता यांची चर्चा वाचकांमध्ये असते. सर्व दिवाळी अंक एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी फेमस बुक सेंटरच्यावतीने हे प्रदर्शन भरविले जात आहे. यंदा प्रदर्शनाचे हे १५वे वर्ष आहे. पुस्तक प्रदर्शन व विक्री ५ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या सेंटरचे प्रमोद मुळे यांनी सांगितले, यंदाच्या या ‘दिवाळी ग्रंथ महोत्सव’ात ७० हजार पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध १०० वर प्रकाशनची पुस्तके येथे आहेत. विशेष म्हणजे, ३०० पेक्षा जास्त दिवाळी अंक आहेत. या प्रदर्शनात पुस्तक पाहणे सोपे जावे यासाठी पुस्तकांची विषयवार मांडणी करण्यात आली आहे. चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, ललित, धार्मिक, आध्यात्मिक, बाल साहित्य, फुले-आंबेडकर साहित्य, आरोग्य आणि पाककृतीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. या शिवाय अनेक जुनी दुर्मिळ पुस्तकेही येथे आहेत. प्रत्येक पुस्तकावर १० टक्के सूट देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)