एलएलबीच्या विद्यार्थ्याने केला विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:08 IST2021-03-21T04:08:00+5:302021-03-21T04:08:00+5:30

नागपूर : वर्धमान नगरच्या एका २२ वर्षाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांने १२ वीच्या विद्यार्थिनीशी मैत्री करून तिच्यावर अत्याचार केला. विद्यार्थिनीने ...

LLB student abuses student | एलएलबीच्या विद्यार्थ्याने केला विद्यार्थिनीवर अत्याचार

एलएलबीच्या विद्यार्थ्याने केला विद्यार्थिनीवर अत्याचार

नागपूर : वर्धमान नगरच्या एका २२ वर्षाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांने १२ वीच्या विद्यार्थिनीशी मैत्री करून तिच्यावर अत्याचार केला. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार कळमना पोलिसांनी आरोपी मृणाल चंद्रशेखर राऊत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

एलएलबीचा विद्यार्थी मृणालकडे चार कुत्री आहेत. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी डीलरच्या मुलीकडेही तीन कुत्री आहेत. दोघेही कुत्र्यांचे केस कापण्यासाठी एका सलूनच्या दुकानावर आले होते. दरम्यान, त्यांची ओळख झाली. मृणालने कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तिचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यानंतर त्यांच्यात मोबाईलवर चॅटिंग होत होती. दोघांच्या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. तिच्या घरी ८ मार्चला कोणीही नसल्यामुळे मृणाल तिच्या घरी गेला. तिथे कुत्र्याला प्रशिक्षण दिल्यानंतर तो तिला शारीरिक सुखाची मागणी करू लागला. शारीरिक संबंध न केल्यास मैत्री तोडण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर तो तिच्याशी नेहमीच शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. विद्यार्थिनीने याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. तिचे वडीलही लग्नासाठी तयार झाले. तिने फोन करून मृणालची भेट घेतली. परंतु त्याने लग्नास नकार दिला.

.....

कुटुंबीय आरोपीच्या घरी

मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीचे कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले होते. त्यांनी मृणालच्या आईवडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु त्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर विद्यार्थिनीने मृणालविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

....

Web Title: LLB student abuses student