शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या जनगणनेबाबत मोदींना लिहिणार पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्ययूज नेटवर्क नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी ...

लोकमत न्ययूज नेटवर्क

नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. यातच आता भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी जनगणना व्हावी, असे स्पष्ट करीत त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे शनिवारी येथे पत्रपरिषदेत जाहीर केले.

ओबीसींची जनगणना न झाल्यामुळे त्यांना अल्प प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळतो. तर भटक्या जमातींची दयनीय परिस्थिती आहे. तत्कालिन भाजप सरकारने ओबीसीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. सारथीला एका दिवसांत निधी दिला जात असताना महाज्योतीबाबत आकस का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसीमध्ये ३४६ जाती असताना राज्य शासनाने केवळ ८० कोटींचा निधी दिला. यातून समाजाचे काय हित साधले जाणार? तत्कालिन सरकारने महाज्योतीची स्थापना केल्यानंतर ३८० कोटींचा निधी जाहीर केला होता; परंतु सत्ताबदल झाल्यानंतर तो निधीही खर्च केला नाही. केवळ कागदावरच संस्थेचे अस्तित्व दिसून येते. राज्य सरकारने सारथी, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीची स्थापना केली; परंतु निधी वाटपात आखडता हात घेतला. अधिवेशनात महाज्योतीला १० हजार कोटींची मागणी केली होती; परंतु राज्य सरकारची देण्याची ऐपत नसल्याने ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत बसलेल्या ओबीसी नेत्यांना निधी खेचून आणता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व नंतर रस्त्यावर उतरावे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. ती भीती दूर करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची भूमिका त्यांनी मांडली. धनगराच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे सांगितले.

------------