शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा!

By admin | Updated: May 15, 2016 02:40 IST

आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे.

लोकमत जलमित्र अभियान : जलतज्ज्ञ के. के. मराठे यांचा सल्लानागपूर : आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे. मागील ५० वर्षांतील पावसाची आकडेवारी पाहता, पाऊस हा कधीच कमी पडलेला नाही. केवळ त्याचे चक्र बदलले आहे. वेळापत्रकात गडबड झाली आहे. पाऊस हा लहरी झाला आहे. त्यामुळे तो कधी एकाच दिवशी धो-धो पडतो आणि पुढील संपूर्ण महिना कोरडा जातो. यावर जल व्यवस्थापन हाच एकमेव पर्याय असून, त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची गरज आहे. असे मत जलतज्ज्ञ के. के. मराठे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ ने राज्यभरात सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानातर्गंत मराठे यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मराठे यांनी ‘लोकमत’ च्या अभियानाचे कौतुक सुद्धा केले. ते पुढे म्हणाले, धो-धो कोसळणारा पाऊस जमिनीत मुरत नाही. पावसाचे सर्व पाणी नदी-नाल्यांमधून वाहून जाते. त्या पाण्यासोबत माती सुद्धा वाहून जाते. त्यामुळे ते सर्व पाणी अडवून त्याला जमिनीत जिरविणे, आज काळाची गरज ठरली आहे. त्यासाठी ‘माथा ते पायथा’ ही सर्वोत्तम शास्त्रोक्त पद्घत आहे. याच पद्घतीचा उपयोग करून सेंटर फॉर रुरल वेलफेअर, या संस्थेने मागील १९९७-९८ मध्ये राज्यभरात इंडो-जर्मन पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. त्यात विदर्भातील सुमारे २५ पेक्षा अधिक गावांचा समावेश होता. आज त्या सर्व गावात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु दुर्दैवाने तो कार्यक्रमच ठप्प पडला आहे. या कार्यक्रमात पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मार्गात खंदकासारखे मोठमोठे खड्डे तयार करून, पाणी अडविल्या जाते. शिवाय शिवारातील दगडांचा उपयोग करून बांध तयार केला जातो. यानंतर नदीनाल्यांचे खोलीकरण केल्या जाते. यातून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरत असल्याचा विश्वास यावेळी मराठे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)