शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ रद्द होण्याची शक्यता कमी

By admin | Updated: July 28, 2015 03:50 IST

राज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवरच एलबीटी कायम ठेवण्यासाठी अधिसूचना

जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी राहणार : सरकारचा नवा प्रस्तावसोपान पांढरीपांडे ल्ल नागपूरराज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवरच एलबीटी कायम ठेवण्यासाठी अधिसूचना काढली असली तरी हा प्रयत्न अयशस्वी ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी कायम राहण्याचीच अधिक शक्यता आहे.राज्य सरकारने २०१३ साली मुंबई वगळून २५ महानगरपालिका क्षेत्रातून आॅक्ट्रॉय रद्द करून त्या शहरामध्ये एलबीटी लागू केला. त्यावेळी राज्यभरचे आॅक्ट्रॉयचा महसूल १४००० कोटी रुपये होता. त्यापैकी मुंबई शहराचा महसूल ७००० कोटी होता व २५ शहरांमधील महसूल ७००० कोटी होता. यात वार्षिक १० टक्के वाढ गृहीत धरली तर आज २५ महानगरपालिकांचा एलबीटीचा महसूल ८४०० कोटी असावा. सरकारला जर एलबीटी रद्द करायचा असेल तर या महसुलाची भरपाई करणे आवश्यक आहे पण ते अशक्य आहे. त्यामुळे भरपाईची रक्कम कमी करण्यासाठी सरकारने ५० कोटी उलाढालीचा प्रस्ताव आणला आहे.राज्य सरकारचे ‘लॉजिक’याबाबतीत बोलताना फेडरेशन आॅफ असोसिएशन्स इन महाराष्ट्र (फॅम)चे अध्यक्ष मोहन गुरनानी म्हणाले की, राज्य सरकारने यासाठी मजेदार ‘लॉजिक’ वापरले आहे. ८४०० कोटी महसुलापैकी जवळपास ८० टक्के म्हणजे ६४०० कोटी रुपये महसूल ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून मिळतो व अशा व्यापाऱ्यांचे प्रमाण फक्त तीन टक्के आहे. त्यामुळे ५० कोटीचा निकष लावला तर ९७ टक्के व्यापाऱ्यांना एलबीटीपासून मुक्ती मिळेल व त्यांच्याकडून मिळणाऱ्या २००० कोटी रुपयांचीच भरपाई सरकारला करावी लागेल.सरकारचे हे लॉजिकच चुकीचे आहे कारण त्यामुळे एलबीटीचा बोजा फक्त तीन टक्के व्यापाऱ्यांवर पडेल व ते अन्यायकारक ठरेल. यामुळे बडे व्यापारी आपली उलाढाल अनेक छोट्या कंपन्यांमध्ये विभाजित करतील व एलबीटी चुकवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांकडूनही एलबीटीचा महसूल मिळणार नाही, असे गुरनानी म्हणतात.वाचकांना हे आठवत असेलच की यापूर्वी एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारने व्हॅटवर अधिभार लावण्याचा व स्टॅम्पड्युटी वाढविण्याचा प्रस्ताव आणले होते व ते दोन्ही अयशस्वी ठरले होते.आता आंशिक स्वरूपात एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५० कोटी उलाढालीचा प्रस्ताव तोसुद्धा सफल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारला ‘जीएसटी’ लागू होईपर्यंत एलबीटी आपोआप संपणार आहे आणि सरकार त्याचीच वाट बघते आहे.(उद्या वाचा- नागपुरात १५० बड्या व्यापाऱ्यांवर पडणार ६२५ कोटी एलबीटीचा बोजा?)