शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळातच प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप

By admin | Updated: January 13, 2017 02:08 IST

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना तिसऱ्या टप्प्यात गुरुवारी गोंधळातच भूखंड वाटप करण्यात आले.

नागपूर : शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना तिसऱ्या टप्प्यात गुरुवारी गोंधळातच भूखंड वाटप करण्यात आले. प्रारंभी आठ जणांना भूखंड नाकारल्यानंतर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी भूखंडाची कागदपत्रे स्वीकारली.बिगर शेतकरी वर्गवारीतील ८१ प्रकल्पग्रस्तांना दोन हजार आणि २९ जणांना अडीच हजार चौरस फूट आकाराच्या चिचभुवन येथील भूखंडाची कागदपत्रे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मिहानमधील मध्यवर्ती इमारतीतील सभागृहात देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या यादीनुसार गुरुवारी ११८ जणांना भूखंड वाटप करण्यात येणार होते. पण काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे सहा जणांना दोन हजार चौरस फूट आणि दोन जणांना अडीच हजार चौरस फूट आकाराचे भूखंड नाकारण्यात आले. दोन टप्प्यात १५७ प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाकारलेयापूर्वी एक हजार चौरस फूट आकाराचे भूखंड वाटप करताना ९३ प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले होते. यादीत २४९ जणांची नावे होती. पण प्रत्यक्षात १८० जणांना बोलविण्यात आले आणि त्यातील १५६ जणांना भूखंडाची कागदपत्रे देण्यात आली. याशिवाय ७ जानेवारीला १५०० चौरस फूट भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ४२१ जणांची नावे यादीत होती. प्रत्यक्षात ६५ जणांना वगळून ३५६ जणांना भूखंडाची कागदपत्रे देण्यात आली. दोन टप्प्यात झालेल्या वाटपात १५७ प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाकारल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. तिसऱ्या टप्प्यातही दावेदार प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळणार वा नाही, अशी भीती त्यांच्यात होती. त्यामुळेच प्रारंभी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी वर्गात तीन हजार आणि त्यावरील चौरस फूट आकाराच्या भूखंडाची कागदपत्रे २० जानेवारीला सोपविण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी व एमएडीसीचे पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, उपविभागीय अधिकारी पांडे, तहसीलदार (शहर) व भूसंपादन अधिकारी बोरकर आणि एमएडीसीचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)