शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनुसूचित जातीचे लाखावर विद्यार्थी होणार उच्च शिक्षणापासून वंचित

By आनंद डेकाटे | Updated: September 9, 2024 16:25 IST

Nagpur : ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मिळावी सहा महिन्यांची मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि ईतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून शासनाद्वारे घेण्यात येणारे दोन कॅप राऊंड हे पुर्णत्वास आलेले आहेत. परंतु अद्यापही अनुसूचित जातीच्या लाखाच्यावर विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील जात पडताळणी समित्या काम करतात. सर्व समित्यांची जात पडताळणी प्रक्रियेची कामे मंदावलेली आहे. त्यामुळे त्याचा सरळ फटका अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या सर्व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. पण प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित होत आहे.

त्याच धर्तीवर ओबीसी व एस.इ.बी.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन सचिव सुमंत भांगे यांनी शासन निर्णय काढून त्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी दिला आहे. परंतु अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना यामधून जाणीवपूर्वक डावलले गेले. सध्या जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी अनेक अनुृसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होत आहे. तेव्हा त्यांनाही सहा महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

"६ महिन्याची मुदत वाढ फक्त ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना देऊन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर शासन आणि प्रशासनाने अन्याय केला आहे. लाखो विद्यार्थी प्रमाणपत्रा अभावी उच्च शिक्षणापासून वंचित होणार आहेत तेव्हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनाही सहा महिन्याची मुदतवाढ मिळावी."- आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर