शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी महिलांनी पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे

By admin | Updated: February 10, 2015 00:49 IST

पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही,

पेन्शन परिषद : बाबा आढाव यांचे प्रतिपादन नागपूर : पेन्शन ही आमच्या न्याय्य हक्काची मागणी आहे परंतु लढल्याशिवाय ही मागणी मान्य होणार नाही. जोपर्यंत शासनाला आपली एकजुटता दिसणार नाही, तोपर्यंत शासन या मागण्यांचा विचारही करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढावी लागले. तेव्हा पेन्शनसाठी कष्टकरी कामगार महिलांनी रस्त्यावर उतरण्यास तयार राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी आणि असुरक्षित कष्टकरी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. बाबा आढाव यांनी येथे केले. विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे सोमवारी सर्वोदय आश्रम विनोबा विचार केंद्र धरमपेठ येथे ‘घरेलु कामगारांची पेन्शन परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी होत्या. तर सामाजिक कृतज्ञता निधी पुणेचे कार्यवाह प्रा. सुभाष वारे, शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबा आढाव म्हणाले, आमदार आणि खासदार एकदा निवडून आले की, त्यांना जीवनभरासाठी पेन्शन दिली जाते. तेव्हा कष्टकरी महिलांना का नाही. त्यांनाही म्हातारपणात पेन्शन मिळावी, ही मागणी काही केवळ नागपूर किंवा विदर्भातील मोलकरणींचीच नाही, तर समस्त कष्टकरी महिलांची आहे. त्यामुळे कष्टकरी महिलांना पेन्शन मिळण्यासाठी देशव्यापी लढा लढण्याची गरज आहे, या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पेन्शन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तिथे लढाईची रूपरेषा सुद्धा ठरविली जाईल. या मागणीसाठी आपण दिल्लीला धरणे दिले तेव्हा सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याला भेटायला आले होते. तुमच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. आमचे सरकार सत्तेवर येताच कष्टकऱ्यांना पेन्शन लागू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. तेव्हा आता त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. त्यांना निवेदने द्या आणि केव्हापर्यंत पेन्शन लागू करता, याचा जाब विचारा. पेन्शन लागू झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्यास तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुभाष वारे म्हणाले, मोलकरणींसह ऊस तोड कामगार महिला आणि कोकणात मासेमारीमध्ये सहभागी असलेल्या कष्टकरी महिलांनासुद्धा पेन्शन मिळण्याची गरज आहे. ही लढाई लढत असतानाच विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शैलजा आरडकर, प्रा. धम्मसंगिणी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोलकरणींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एकपात्री नाट्य सादर करणाऱ्या भाग्यश्री ढगे, श्वेता मोटघरे आणि वंदना माटे या महिला कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला. विदर्भ मोलकरीण संघटनेचे सचिव विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता भोंगाडे यांनी संचालन केले. भाग्यश्री ढगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घेणार अधिवेशनमोलकरणींना पेन्शन मिळावी या मागणीसाठी आता लढा सुरू झाला आहे. यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोरील मोकळ्या मैदानावर मोलकरणींचे अधिवेशन घेण्यात येईल. पोलिसांनी परवानगी न दिल्यास ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल, असा इशारा विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे दिला.