ग्राहकांच्या पैशावर ‘उबर’ होतेय कुबेर !

By Admin | Updated: January 4, 2017 01:58 IST2017-01-04T01:58:14+5:302017-01-04T01:58:14+5:30

‘उबर’ या खासगी प्रवासी वाहनातून प्रवास न करताही प्रवाशांकडून ५० रुपये वसूल केले जात आहे.

Kubera being 'recovering' on the money! | ग्राहकांच्या पैशावर ‘उबर’ होतेय कुबेर !

ग्राहकांच्या पैशावर ‘उबर’ होतेय कुबेर !

प्रवास न करताही आकारले जाते भाडे: प्रवाशांना फटका कशासाठी ?
नागपूर : ‘उबर’ या खासगी प्रवासी वाहनातून प्रवास न करताही प्रवाशांकडून ५० रुपये वसूल केले जात आहे. अनेक प्रवाशांना याची माहितीच राहात नाही. परंतु जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा त्यांच्याकडून ‘फेअर इस्टिमेट’मध्ये (निर्धारित भाडे) ५० रुपये जोडले जाते. ज्या प्रवाशाला या प्रकाराची माहिती आहे, ते विरोध करीत असले तरी त्यांच्याकडूनही पूर्ण भाडे वसूल करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. ‘उबर’मधून प्रवास करण्यासाठी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यावर काही वेळातच उबर चालकाचा फोन येतो. परंतु यादरम्यान हा प्रवास रद्द करायचा असेल आणि चालकाला याची माहिती दिल्यास तर तो प्रवास रद्द करण्यास सुचवितो. प्रवासी आपल्या ‘मोबाईल अ‍ॅप’मधून रद्द करण्याचा पर्याय निवडतो. मात्र त्याच वेळी एक सूचना येते,‘काय आपण प्रवास रद्द करु इच्छिता?, जर आपण प्रवास रद्द केला तर पुढील प्रवासात प्रवास रद्द करण्याच्या शुल्करूपात ५० रुपये अतिरिक्त आकारले जातील.’

Web Title: Kubera being 'recovering' on the money!