शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मधल्याने केली धाकट्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : अल्पवयीन प्रेयसीशी लग्न करण्यावरून दाेन भावांमध्ये दारू प्यायल्यानंतर जाेरात भांडण झाले. त्यातच मधल्याने धाकट्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : अल्पवयीन प्रेयसीशी लग्न करण्यावरून दाेन भावांमध्ये दारू प्यायल्यानंतर जाेरात भांडण झाले. त्यातच मधल्याने धाकट्या भावाला ढकलत खाेलीत नेले आणि आतून दार बंद केले. त्यातच त्याने धाकट्या भावाच्या गळा व पाेटावर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे गुरुवारी (दि. १) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

गीतेश रामदास मानकर (२९, रा. काकडे ले-आऊट, दहेगाव रंगारी, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, सतीश रामदास मानकर (३३, रा. वेकाेलि काॅलनी, वलनी, ता. सावनेर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. रामदास मानकर यांना गीतेश, सतीश व जगदीश अशी तीन मुले असून, थाेरला मुलगा जगदीश (३६) हा खंडाळा, ता. पारशिवनी, मधला मुलगा सतीश वलनी येथे राहत असून, धाकटा गीतेश त्यांच्यासाेबत दहेगाव (रंगारी) येथे राहायचा.

गीतेशचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम हाेते. त्याला तिच्याशी लग्न करावयाचे हाेते. या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विराेध हाेता. त्यातच तिच्या भाऊजींनी (माेठ्या बहिणीचा पती) गुरुवारी सकाळी गीतेशला त्याच्या घरी येऊन तिच्याशी लग्न न करण्याची समज दिली हाेती. ही बाब माहिती हाेताच सतीश दुपारी वलनीहून दहेगाव (रंगारी) येथे घरी आला. गीतेश व सतीश घरीच दारू प्यायले. त्यातच त्याच्या लग्नाचा विषय निघाला. लग्नाला विराेध केला जात असल्याने गीतेशला राग आला.

रागाच्या भरात गीतेश हातात चाकू घेऊन प्रेयसीच्या भाऊजीला मारायला निघाला. त्यामुळे सतीशने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. ताे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सतीशने त्याला ढकलत खाेलीत नेले व दार आतून बंद केले. आत दाेघांचे जाेरात भांडण झाले. त्यातच सतीशने गीतेशच्या गळा व पाेटावर चाकूने वार केले. त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

माहिती मिळताच खापरखेडा पाेलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपी सतीशला अटक केली.

...

लग्नाला विराेध

गीतेशला त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसाेबत लग्न करायचे हाेते. प्रेयसीच्या भाऊजींनी दाेघांना साेबत घेत गीतेशला त्याच्या घरी मुलीपासून (प्रेयसी) दूर राहण्याची सूचना केली. शिवाय, तिच्याशी लग्न केल्यास पाेलिसात तक्रार दाखल करून फसविण्याची धमकी दिली हाेती. त्यामुळे गीतेश दारू प्यायल्यानंतर तिच्या भाऊजीला मारण्यासाठी चाकू घेऊन निघाला हाेता.

...

चाकू पाण्याने साफ केला

या घटनेची माहिती गीतेशचा माेठा भाऊ जगदीश याने गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर ग्रामीणच्या पाेलीस नियंत्रण कक्षाला दिली. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेण्यापूर्वी रक्ताने माखलेला चाकू पाण्याने साफ करून तो खाेलीत ठेवला हाेता. हा चाकू पाेलिसांनी जप्त केला. गीतेशचा खून केल्यानंतर सतीश काही वेळ त्याच खाेलीत झाेपला हाेता.