शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांना अखेर न्याय

By admin | Updated: July 4, 2014 01:07 IST

१६ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या नायब तहसीलदारांना शासनाने अखेर न्याय दिला असून संघटनेने दोन

पदोन्नतीचा प्रश्न सुटला : संप मागेनागपूर : १६ नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत असलेल्या नायब तहसीलदारांना शासनाने अखेर न्याय दिला असून संघटनेने दोन दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेतला आहे.तांत्रिक त्रुटींमुळे १६ नायब तहसीलदार पदोन्नतीपासून वंचित होते. त्यासाठी नायब तहसीलदार-तहसीलदार संघटना गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करीत होती. विभागीय आयुक्तांपासून तर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांपर्यत संघटनेने या मागणीचा पाठपुरावा केला. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. या दरम्यान वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. प्रत्येकवेळी फक्त आश्वासने देऊन त्यांची बोळवण केली जात होती. अखेरचा उपाय म्हणून नायब तहसीलदार-तहसीलदार संघटनेने १ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले. पूर्व विदर्भातील तहसीलदार, नायब तहसीलदार यात सहभागी झाले. त्यामुळे कामकाजावर अंशत: परिणामही झाला होता. दोन दिवसांनंतर गुरुवारी या आंदोलनाची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. सकाळी १० वाजता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले.मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला. नागपूर विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदारांनी नियमितपणे कामकाजात सहभागी होण्याचे,आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष दिलीप फुलसुंगे, मनोहर पोटे, मोहन टिकले, भास्कर बांबोळे आणि गजानन निशानकर आदींचा समावेश होता. संपावर तोडगा काढल्याबद्दल संघटनेने शासनाचे आभार मानले आहे. (प्रतिनिधी)