शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

माथनी पुलावरील प्रवास धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : माैदा शहर व माथनी (ता. माैदा) या गावाला जाेडणाऱ्या कन्हान नदीवरील पुलाचे बांधकाम ब्रिटिशांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : माैदा शहर व माथनी (ता. माैदा) या गावाला जाेडणाऱ्या कन्हान नदीवरील पुलाचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात करण्यात आले हाेते. हा पूल माेडकळीस आला असून, मागील वर्षीच्या पुरामुळे पुलाच्या मध्यभागी व इतरत्र खड्डे तयार झाले आहेत. या पुलावरून आजही रहदारी सुरू असून, ही वर्दळ धाेकादायक ठरण्याची शक्यता बळावली आहे.

या ब्रिटिशकालीन पुलाचे आयुष्य संपत आले असून, देेखभाल व याेग्य दुरुस्तीअभावी ताे अधिक माेडकळीस आला आहे. आधीच अरुंद असलेल्या या पुलाच्या दाेन्ही बाजूंचे सुरक्षा कठडे फार पूर्वीच तुटले. त्या सुरक्षा कठड्यांच्या निर्मितीची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. त्यातच ऑगस्ट २०२० मध्ये कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे या पुलाच्या मध्यभागी व इतर ठिकाणी माेठमाेठे खड्डे तयार झाले आहेत.

१८ वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व जड वाहतूक याच पुलावरून होत होती. या पुलाचे आयुष्य लक्षात घेता याला पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात आली. सध्या या पुलावरील रहदारी कमी झाली असली तरी बैलगाडी, ऑटो, कार, ट्रॅक्टर व इतर हलक्या वाहनांची वर्दळ सुरू आहे. या पुलाचा वापर व संभाव्य धाेका लक्षात घेतला या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची किंवा या पुलावरील वाहतूक कायम बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

...

भिंत ताेडून वाहतूक सुरू

हा पूल धाेकादायक असल्याने यावरून हाेणारी वाहतूक बंद करण्यासाठी पुलाच्या दाेन्ही टाेकांवर सिमेंटच्या भिंती बांधल्या हाेत्या. मात्र, काहींनी या भिंतींना भगदाड पाडून त्यातून दुचाकी वाहने न्यायला सुरुवात केली. ही भगदाडे आता माेठी झाली असून, त्यांतून बैलगाडी व हलकी वाहने नेली जातात. या पुलामुळे माथनी ते माैदा हे अंतर केवळ दाेन किलोमीटर असल्याने नागरिक जीव धाेक्यात घालून याच पुलाचा वापर करतात.