शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जोशी म्हणाले, काही बोलणार नाही

By admin | Updated: November 29, 2015 03:27 IST

बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे.

संघ स्वयंसेवकांना केले मार्गदर्शन : स्मृतिमंदिरात घालविला दिवसनागपूर : बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे. ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, कोणत्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचे नाही असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. डॉ.जोशी यांनी शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिराला भेट दिली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ते दिवसभर स्मृतिमंदिरातच होते. रेशीमबागेत संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.जोशी यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. एकात्म मानवतावाद आणि भारतीय दर्शन या विषयावर त्यांनी स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. डॉ.जोशी सकाळी ११.३० च्या सुमारास स्मृतिमंदिरात पोहोचले व त्यानंतर ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत तेथेच होते. तेथून ते एका खासगी हॉटेलकडे रवाना झाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी दोघेही नागपुरात नसल्यामुळे डॉ.जोशी हे संघ मुख्यालयात गेले नाही. परंतु रेशीमबागेत त्यांनी संघाचे काही पदाधिकारी व प्रचारकांशी संवाद साधला. बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह तीन नेत्यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात डॉ. जोशी यांनीही स्वाक्षरी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली होती. डॉ.जोशी यांची संघाशी जवळीक आहे व या पार्श्वभूमीवर त्यांची रेशीमबागला उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांना रेशीमबागेतच गाठले. मी येथे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी आलेलो नाही. त्यामुळे त्या विषयांवर भाष्य करणार नाही. हा माझा खासगी दौरा आहे व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायला आलो आहे. या दौऱ्याचा कोणीही आपल्या हिशेबाने अर्थ काढू नये, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी) स्वयंसेवकांना दिले आचार-विचारांचे मार्गदर्शनसंघाच्या शिबिरात डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी स्वयंसेवकांना ‘एकात्म मानववाद व भारतीय दर्शन’ तसेच ‘वेद उपनिषद आणि षड्दर्शन’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी इतिहासाचे विविध दाखले देत त्यांनी आजच्या काळात समाजात नीतिमत्ता व संस्कार यांचा प्रसार कसा व्हायला हवा यावर प्रकाश टाकला. शिवाय विविध क्षेत्रांत राजकारणाचा प्रभाव वाढत असताना आचार-विचारांची शुद्धतादेखील वाढणे आवश्यक असल्याच्या मुद्यावरदेखील त्यांनी भर दिला.