रोख रकमेसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:34+5:302021-01-22T04:09:34+5:30

उमरेड : अज्ञात आराेपीने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून ...

Jewelry lamps with cash | रोख रकमेसह दागिने लंपास

रोख रकमेसह दागिने लंपास

उमरेड : अज्ञात आराेपीने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उमरेड शहरातील आदर्शनगर, साई मंदिर परिसरात १८ ते १९ जानेवारीदरम्यान रात्रीच्या सुमारास घडली.

ममता जयकृष्ण पाटील (३६, रा. आदर्शनगर, साई मंदिर, उमरेड) या बाहेरगावी गेल्या हाेत्या. दरम्यान, त्यांच्या घरी कुणीही नसताना चोरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चोरट्याने बेडरूममधील लाेखंडी आलमारीमधून २० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने तसेच राेख २०,००० रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शिवाय, चाेरट्याने शेजारी राहणारे केशव बाबुळकर यांच्या घराचे कुलूप ताेडून चाेरी करण्याचा प्रयत्न केला. घरात चाेरी झाल्याचे लक्षात येताच ममता पाटील यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तपास पोलीस हवालदार आनंद धात्रक करीत आहेत.

Web Title: Jewelry lamps with cash