शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी तरुणास कारावास

By admin | Updated: January 1, 2015 01:24 IST

भरदुपारी घरात घुसून एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची

न्यायालय : दंडाच्या रकमेतील १० हजार पीडित मुलीला देण्याचा आदेशनागपूर : भरदुपारी घरात घुसून एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये आरोपीने पीडित मुलीला द्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला. राजेश राजू साखरे (२०), असे आरोपीचे नाव असून तो गरोबा मैदान कापसे चौक येथील रहिवासी आहे. ही दुर्दैवी घटना ८ मार्च २०१३ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली होती. पीडित मुलगी आपल्या घरात एकटीच असताना आरोपी साळसूदपणे घरात घुसला होता. त्याने दार आतून बंद करून बलात्कार केला होता. पीडित मुलीचा भाऊ घरी परत येताच आतून दार बंद होते. त्याने दार ठोठावताच आरोपीने दार उघडून त्याला हिसका मारून पळ काढला होता. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२)(एच)(एम), ४५२ आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. शेंडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. पराग उके यांनी काम पाहिले. सहायक फौजदार लीलाधर वरठी आणि नायक पोलीस शिपाई आशिष कोल्हे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)