जबलपूर-चांदाफोर्ट रेल्वे उद्यापासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:19+5:302021-03-07T04:08:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे मंत्रालयाने जबलपूर-चांदाफोर्ट दरम्यान नवीन त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही ...

Jabalpur-Chandafort train will run from tomorrow | जबलपूर-चांदाफोर्ट रेल्वे उद्यापासून धावणार

जबलपूर-चांदाफोर्ट रेल्वे उद्यापासून धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रेल्वे मंत्रालयाने जबलपूर-चांदाफोर्ट दरम्यान नवीन त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे ८ मार्चपासून धावेल. यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे सोमवारी ८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता नवी दिल्ली येथून व्हीडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून या शुभारंभीय रेल्वेला हिरवी झेंडी दाखवतील.

ही रेल्वे जबलपूर येथून सायंकाळी ४.३० वाजता रवाना होऊन मदनमहल, काचापुरा, नैनपूर, बालाघाट, गोंदिया मार्गे रात्री १ वाजता चांदाफोर्ट येथे पोहोचेल. तर नवीन रेल्वे ०२२७४-०२२७३ जबलपूर-चांदाफोर्ट-जबलपूर त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेनची नियमित वेळ पुढीलप्रमाणे राहील. ०२२७३ चांदाफोर्ट -जबलपूर सुपरफोस्ट स्पेशल ट्रेन ९ मार्चपासून प्रत्येक मंगळवार, गुरुवार, शुक्रवारी दुपारी २.५० वाजता रवाना होऊन रात्री ११.२५ वाजता जबलपूरला पोहोचेल. तर ०२२७४ जबलपूर-चांदाफोर्ट सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ११ मार्चपासून प्रत्येक मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी सकाळी ५.१५ वाजता रवाना होईल आणि दुपारी १.३५ वाजता चांदाफोर्ट येथे पोहोचेल. मदनमहल, काचापुरा, नैनपूर, बालाघाट आणि गोंदिया येथे या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे.

Web Title: Jabalpur-Chandafort train will run from tomorrow