शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

इतवारी ते छिंदवाडा ब्रॉडगेजवर धावली रेल्वे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

नागपूर : छिंदवाडा ब्रॉडगेज तयार झाल्यानंतर सोमवारी इतवारीवरून छिंदवाड्यासाठी पहिल्यांदा रेल्वेगाडी धावली. त्यामुळे इतवारी आणि छिंदवाडा येथील प्रवाशांना दिलासा ...

नागपूर : छिंदवाडा ब्रॉडगेज तयार झाल्यानंतर सोमवारी इतवारीवरून छिंदवाड्यासाठी पहिल्यांदा रेल्वेगाडी धावली. त्यामुळे इतवारी आणि छिंदवाडा येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या दिवशी रेल्वेगाडी क्रमांक ०८११९ इतवारी-छिंदवाडा पॅसेंजर रेल्वेगाडीतून ११५ प्रवाशांनी इतवारी रेल्वेस्थानकावरून प्रवास केला. बहुप्रतीक्षित इतवारी-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या कामाची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. हे काम २०११ मध्ये पूर्ण करावयाचे होते. परंतु या कामाला बराच काळ होऊन हे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले. आजपासून इतवारी-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर वाहतूक सुरू झाली. त्यानुसार इतवारी-छिंदवाड्यासाठी पहिली रेल्वेगाडी चालविण्यात आली. सोमवारी सकाळी ७.४५ वाजता इतवारी रेल्वेस्थानकावरून ही गाडी रवाना झाली. या गाडीला इतवारीचे स्टेशन व्यवस्थापक श्रीराम यादव आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्ञानेश्वर कराडे यांनी हिरवी झेंडी दाखविली. इतवारी-छिंदवाडादरम्यान ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे दोन्ही शहरातील व्यापारी आणि नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

............