शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवतपा तापतोय

By admin | Updated: May 26, 2017 02:41 IST

नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला.

नागपूर ४५.५ अंशावर : आकाशात ढगांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला. यात नागपुरातील तापमान ४५.५ अंशावर पोहोचले, तर चंद्रपूर ४७ अंशावर खाली आले. गुरुवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सूर्य आग ओकू लागला आहे. मागील आठवडाभरापासून ४५ अंशाच्या घरात असलेल्या विदर्भातील तापमानाने आता अचानक ४८ अंशाकडे वाटचाल सुरू केली आहे. या उन्हाच्या तीव्र लाटांमध्ये अक्षरश: विदर्भ होरपळून निघत आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने या नवतपाच्या काळात विदर्भातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचावासाठी प्रत्येकानेकाळजी घेण्याची गरज आहे. जाणकारांच्या मते, नवतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात अचानक वाढ होते. त्याचा परिणाम गुरुवारी पहिल्याच दिवशी दिसून आला. सकाळपासूनच अंगाला चटके बसत होते. यानंतर दुपारी सूर्य अक्षरश: आग ओकत होता. मात्र सायंकाळी ४.३० वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आकाशात ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा कोसळल्या. यामुळे वाढत्या तापमानाला थोडा ब्रेक लागला होता. त्याचवेळी हवामान खात्याने नवतपाच्या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी नवतपाच्या काळात उपराजधानीतील पारा हा ४७ अंशावर तर चंद्रपूर ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. बुधवारी चंद्रपूर येथील तापमानाने ४७.२ अंशावर सर्वोच्च उच्चांक गाठला होता. गुरुवारी मात्र ४७ अंशावर खाली आले आहे. मात्र त्याचचेळी नागपुरातील तापमानात ०.२ अंशाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नागपुरातील तापमान ४५.३ अंशावर होते.पावसाची शक्यता हवामान खात्याने नवतपामधील २५ आणि २६ मे रोजी सर्वाधिक तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी २७ व २८ मे रोजी सायंकाळी वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २९ आणि ३१ मे दरम्यान वादळी पाऊससुद्धा होऊ शकतो, असे सांगितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार यापूर्वी २ जून २००७ रोजी चंद्रपूर शहरातील तापमान तब्बल ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तो आजपर्यंतच्या तापमानातील सर्वोच्च उच्चांक मानला जातो. या वाढत्या तापमानाचा माणसासह पशु-पक्ष्यांना सुद्धा फटका बसत आहे. गुरुवारी नागपूर ४५.५, चंद्रपूर येथे ४७ अंश, अकोला ४५.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४२.६, ब्रम्हपुरी ४६.९, गोंदिया ४४.४, वाशिम ४२.०, वर्धा ४५.७ व यवतमाळ येथे ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.