शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘आयर्न लेडी’ने विकासाची दिशा दिली

By admin | Updated: November 22, 2015 03:04 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक संघटनांतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

इंदिरा गांधी यांची जयंती साजरी : काँग्रेससह संघटनांतर्फे अभिवादननागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक संघटनांतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देत सर्वसामान्य माणसाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. ‘आयर्न लेडी’ने कठीण प्रसंगात कणखर भूमिका घेत देशाला सावरले. त्यांच्या नेतृत्त्वात देशाने प्रगती केली, अशा शब्दात गौरव करीत आदरांजली अर्पण करण्यात आली. युवक काँग्रेस युवक काँग्रेतर्फे चिचार ओळीतील गांधी पुतळा चौकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शहर काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा होते. या वेळी कोटेचा म्हणाले, इंदिरा गांधी या आयर्न लेडी होत्या. गरिबी हटावचा नारा दिला. फक्त विदेश दौरे न करता देशातील गोरगरिब जनतेच्या विकासासाठी काम केले. देशाला एकसूत्र व एकसंध ठेवण्याचे काम केले. या वेळी रिंकू जैन, श्रीकांत ढोलके, लोकेश बरडिया, मोजाहिद खान, आकाश गुजर, आकाश चौरीया आदी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा फ्रंट राष्ट्रीय युवा फ्रंटके अध्यक्ष पिंटु बागडी यांच्या अध्यक्षतेखाली इतवारी शहीद चौक येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी खा. गेव्ह आवारी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका आभा पांडे, सुरेश आगरेकर, अंकुश बागडी, दीपक बागडी, अ‍ॅड. मंगेश भावडकर, विरथ सोनी, कार्तिक सुखदेवे, राकेश बडकुर, राजेश जैन, वसंता मोहनकर, विकास चौधरी, अमोल अवचट आदी उपस्थित होते. उंटखाना काँग्रेस उंटखाना येथे नगरसेविका सुजाता कोंबाडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विठ्ठलराव कोंबाडे, सुजाता सुके, सुधाबाई कांबळे, गिताबाई लुटे, निमा रामटेके, प्रभा महाडिक आदी उपस्थित होते. दिशा सामाजिक संघटना दिशा सामाजिक सांस्कृतिक संकल्पना द्वारे फुटाळा तलाव परिसर येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी नानाभाऊ घोडमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून नाना ठाकरे, तुषार हाडगे, राजेश दोहाते आदी उपस्थित होते. हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसयुवक अध्यक्ष शशिकांत थोटे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणा येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत होत्या. इंदिरा गांधी यांच्या रूपात देशाला सक्षम नेतृत्व मिळाले व त्यांच्या नेतृत्त्वात देशाला विकासाची दिशा मिळाली, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सलाम अली, जावेद शेख, जयेश कोहाळ, शफी शेटे, इसाख शेख, विठ्ठल डाफ आदी उपस्थित होते. बरडे ले-आऊट बोरगांव- गोरेवाडा प्रभागात सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बरडे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विलास बरडे, बबन यादव, रवी कठाळे, रवी वाघमारे, बाबू नायडू, दुर्गेश जयस्वाल आदी उपस्थित होते. झिंंगाबाई टाकळी प्रभाग काँग्रेस कमिटी झिंगाबाई टाकळी येथे सामाजिक कार्यकर्ते नागेश राऊत यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी जनकल्याणाच्या योजना राबवून लोकसंवेचा संदेश दिला, असे मत या वेळी राऊत यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अजय इंगोले, संदीप डोये, विजय राऊत, हेमंत खाडे, विशाल राऊत, चंद्रशेखर राऊत, पिंटू चौधरी, दिनेश सिंद्राम, रमेश काथोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)