शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भारतात गुंतवणूक करा!

By admin | Updated: June 27, 2017 00:27 IST

व्यापारासाठी अनुकूल देश म्हणून भारत पुढे येत आहे. अमेरिकी कंपन्यातील सीईओंनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन

वॉशिंग्टन : व्यापारासाठी अनुकूल देश म्हणून भारत पुढे येत आहे. अमेरिकी कंपन्यातील सीईओंनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पुढील महिन्यात लागू होत असलेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) निर्णय क्रांतिकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेतील प्रमुख २० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, गत तीन वर्षांत आमच्या सरकारने सर्वाधिक विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळविली आहे. या बैठकीला अ‍ॅपलचे टिम कुक, गुगलचे सुंदर पिचाई, सिस्कोचे जॉन चेंबर्स आणि अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस यांची उपस्थिती होती. गत तीन वर्षांत सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांची माहिती मोदी यांनी दिली. सरकारने अशा सात हजार सुधारणा केल्याचे सांगून ते म्हणाले की, व्यापारासाठी अनुकूल वातावरण बनविणे हा त्यामागचा उद्देश आहे.
तब्बल ९० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मोदी यांनी टिष्ट्वट केले की, भारतातील भविष्यातील संधीबाबत सीईओंशी चर्चा केली. देशातील तरुण पिढी आणि वाढता मध्यमवर्ग यामुळे जगाचे लक्ष आता भारतातील अर्थव्यवस्था, निर्मिती, व्यापार, वाणिज्य आणि जनतेच्या संपर्कावर केंद्रित आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन टिष्ट्वट केले की, संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. मोदी यांनी कंपनीच्या प्रमुखांना सांगितले की, भारताची वृद्धी दोन्ही देशांसाठी फायद्याची आहे. यात योगदान देण्याची संधी अमेरिकी
कंपन्यांसमोर आहे. जीएसटीबाबत ते म्हणाले की, जीएसटी लागू
करण्याचा ऐतिहासिक निर्णय अमेरिकेच्या बिझनेस स्कूलमध्ये अध्ययनाचा विषय होऊ शकतो. विलार्ड हॉटेलमध्ये या चर्चेच्या
दरम्यान मोदी यांनी कंपनीप्रमुखांची मते जाणून घेतली. ५०० रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हॉटेल विकसित करण्याच्या संधीबाबतही मोदी यांनी चर्चा केली. अमेरिकी कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ व सरकारच्या अन्य महत्त्वपूर्ण कार्यक्रमास सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.
समजलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपलचे टिम कुक यांनी मोदी यांना बंगळुरुतील आयफोनच्या उत्पादनाबाबत माहिती दिली होती. भारतात या तंत्रज्ञानाशी संबंधित ७,४०,००० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या अ‍ॅप डेव्हलपर्सनी एक लाख अ‍ॅप्स तयार केले आहेत.
या बैठकीनंतर बोलताना सुंदर पिचाई म्हणाले की, आपण भारतातील गुंतवणुकीबाबत उत्साहित आहोत. गत तीन वर्षांत भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले.
जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत अमेरिकी कंपन्यांचा कल सकारात्मक आहे, असेही ते म्हणाले.