शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिरा दिल्याविना पोटातून काढली इंजेक्शनची सुई

By admin | Updated: December 31, 2015 03:30 IST

दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाच्या पोटात इंजेक्शनची सुई ४५ सेंटिमीटर आत गेली. मुलाच्या पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली.

तीन वर्षाच्या मुलावर उपचार : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील घटनानागपूर : दातांवर उपचार करण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाच्या पोटात इंजेक्शनची सुई ४५ सेंटिमीटर आत गेली. मुलाच्या पोटात त्रास होण्यास सुरुवात झाली. सुपर स्पेशालिटीच्या गॅस्ट्रो एंट्रॉलॉजी विभागात मंगळवारी ४५ मिनिट दुर्बिण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही सुई बाहेर काढण्यात आली. यासाठी मुलाच्या पोटाला किंवा कुठल्याच भागाला चिरा देण्याची गरज पडली नाही. गॅस्ट्रो एंट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाचे यशस्वी आॅपरेशन करण्यात आले.हिंगणा येथील रहिवासी तीन वर्षाचा विशाल सैनी एका दंत महाविद्यालयात दाताच्या समस्येमुळे उपचारासाठी गेला. तेथील डॉक्टरच्या चुकीमुळे इंजेक्शनची सुई त्याच्या तोंडातून पोटात ४५ सेंटिमीटर आत गेली. ही सुई ड्युडिनम नावाच्या आतड्यात जाऊन फसली. या सुईचा हिरव्या रंगाचा भाग आत फसला. एक्स रे मध्ये हे स्पष्टपणे दिसत होते. सोमवारी दुपारी ३ वाजता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मुलाला दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत हे रुग्णालय बंद झाले होते. मंगळवारी मुलाचा दुर्बिण पद्धतीने आॅपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुधीर गुप्ता यांनी डॉ. अमोल समर्थ, डॉ. अभय, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. तुषार सखलेचा, तंत्रज्ञ सोनल गट्टेवार आणि परिचारिकांसोबत आॅपरेशनबाबत चर्चा केली. तीन दशकांपासून गॅस्ट्रो एंट्रॉलॉजीच्या क्षेत्रात सक्रिय डॉ. सुधीर गुप्ता यांनी सावधानपूर्वक तोंडातून ही सुई बाहेर काढली. ही सुई अतिशय धारदार होती. ती कुठेही अडकू शकली असती. (प्रतिनिधी)