विदर्भात मान्सून उशिरा पोहचण्याचे संकेत

By Admin | Updated: May 15, 2014 19:44 IST2014-05-14T22:28:11+5:302014-05-15T19:44:11+5:30

Indicating the delay in the monsoon in Vidharbha | विदर्भात मान्सून उशिरा पोहचण्याचे संकेत

विदर्भात मान्सून उशिरा पोहचण्याचे संकेत


नागपूर : मे महिना चांगला तापला तर मान्सून वेळेत येण्याची शक्यता असते. परंतु यावेळी मे महिन्यात तापमान ४४ अंशाच्या पुढे गेलेले नाही. त्यामुळे यंदा मान्सून विदर्भात उशिरा पोहचण्याचे संकेत आहे.
यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वी वर्तविला आहे. गेल्या वर्षी २३ मे रोजी तापमानाचा उच्चांक गाठला होता. नागपूर शहरात ४७.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. सलग २४ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले होते. पावसाळा चांगला झाला होता.
२०११ या वर्षान तीन दिवस तर २००४ मध्ये ५ दिवस तापमान ४४ अंशाच्या पुढे होते. मात्र यावर्षी मे महिन्यातील तापमान अद्याप ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेलेले नाही.
दरवर्षी विदर्भात मान्सून १० जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु यंदा तो १५ दिवस उशिरा पोहचण्याची चिन्हे आहेत. नोंदीनुसार ४ मे १९१७ रोजी सर्वात कमी १९.४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले होते.
मागील काही दिवसापासून विदर्भात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरी आल्या. १.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तापमान ३९.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. अमरावती ४१.२ व ब्रम्हपुरी येथे ४१.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान ४०अंश सेल्सियसच्या खालीच होते. (प्रतिनिधी)

Web Title: Indicating the delay in the monsoon in Vidharbha