शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतेय

By admin | Updated: October 31, 2014 00:48 IST

देशात १९८२-८३ मध्ये कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे.

नागपुरात ३२ टक्के : दरवर्षी दगावतात ७० हजार महिला नागपूर : देशात १९८२-८३ मध्ये कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कर्करोग जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. राज्याचा विचार केला तर मुंबईत हे प्रमाण ३३ टक्के असून विदर्भ दुसऱ्या स्थानी आहे. एकट्या नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. वेळीच निदान हे या मृत्यूला रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याची माहिती आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. सुशील मंधानिया यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात नोव्हेंबर महिना हा स्तनाच्या कर्करोगाची जागृती करण्यासाठी पाळला जातो. त्या निमित्ताने डॉ. मंधानिया यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, देशात दर २२ महिलांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होतो. जगभरात दरवर्षी १ कोटी १० लाख महिला स्तनाच्या कर्करोगाने दगावतात. त्यापैकी २३ टक्के महिला एकट्या भारतातील आहेत. जगाच्या क्र मवारीत स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्यांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकन स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आठ मध्ये एका महिलेला आहे. एकट्या भारतापुरता विचार करायचा तर दरवर्षी १३ लाख महिला कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. त्यापैकी ५ लाख महिलांचा वेळीच निदान न झाल्याने अकाली मृत्यू ओढवतो. एकट्या विदर्भात दर एक लाख महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या १५०० नव्या रु ग्णांची भर पडत आहे. नागपुरात हे प्रमाण ३२ तर वर्धेत २६ टक्के आहे. पुण्यातील दर एक महिलांमध्ये २३ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग कवेत घेतो. स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम देखील वाढते. त्यामुळे वयाची साठी गाठलेल्या महिलांनी वर्षातून किमान एकदा मेमोग्राफी करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)