शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मागील तीन दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. ...

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मागील तीन दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. दुसरीकडे अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हा दर ३.९६ टक्क्यांवर पोहचला आहे. मंगळवारी ३५६ रुग्ण व ११ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १०९५६१ तर मृतांची संख्या ३६१५ झाली.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. आज ५८९८ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर तर १२८६ संशयित रुग्णांची रॅपीड अँटीजेन असे एकूण ७१८४ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत ४.९५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकूण ७४५०३४ चाचण्या झाल्या असून १४.७० टक्के बाधित रुग्ण आढळून आले. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २६६, ग्रामीणमधील ८६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील चार, ग्रामीणमधील तीन तर जिल्हाबाहेरील चार आहेत. बाधितांच्या तुलनेत आजही कमी, १३३ रुग्ण बरे झाले. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२.७३ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी अ‍ॅक्टीव्ह म्हणजे क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ३.८१ टक्के होते. २५ दिवसात यात किंचित वाढ होऊन ती ३.९६ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ४३४५ रुग्ण उपचाराखाली आहेत. सर्वाधिक २०० रुग्ण मेडिकलमध्ये तर ८९ रुग्ण मेयोमध्ये दाखल आहेत.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ७१८४

-बाधित रुग्ण : १०९५६१

_-बरे झालेले : १०१६०१

- उपचार घेत असलेले रुग्ण : ४३४५

- मृत्यू : ३६१५