एआयच्या युगात ओरिजनल काय आणि डुप्लिकेट काय? कसे ओळखाल ?

By नरेश डोंगरे | Updated: December 1, 2025 13:01 IST2025-12-01T13:01:03+5:302025-12-01T13:01:59+5:30

Nagpur : खरे की खोटे, या प्रश्नात अडकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या 'एआय'ने बनवेगिरी करणाऱ्यांना रान मोकळे केले आहे. त्यामुळे त्यांचे हौसले बुलंद झाले आहे. काहीही बनावट तयार करता येते, असा विश्वास पटल्यामुळे ही मंडळी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्डच काय बनावट नोटाही तयार करीत आहेत.

In the age of AI, how do you identify what is original and what is duplicate? | एआयच्या युगात ओरिजनल काय आणि डुप्लिकेट काय? कसे ओळखाल ?

In the age of AI, how do you identify what is original and what is duplicate?

नागपूर : सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआयच्या) जमान्यात ओरिजनल काय आणि डुप्लिकेट काय, याची ओळख पटविणे कठीण ठरले आहे. गेल्या आठवड्यात एका पाठोपाठ आलेल्या तीन व्हिडीओंनी आणि खास करून त्यातील पहिल्या व्हिडीओने प्रचंड खळबळ उडवून दिली होती. व्हिडीओ होता वाघ आणि माणसाचा. अचानक एक पट्टेदार वाघ येतो काय, ओसरीत बसलेल्या अन् माणसाला जबड्यात पकडून उचलून नेतो काय, असा हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचे रान पेटविणारा ठरला होता. वाघ आणि तो प्रसंग एवढा थरारक होता की शंका घेण्यापेक्षा अनेकांनी ग्रामस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर आगपाखड केली होती. त्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू असतानाच वनविभागाने 'तो व्हिडीओ' फेक असल्याचे पत्रक काढले.

वाघोबानेही आपली चूक सुधरविल्याचा व्हिडीओ दुसऱ्या दिवशी व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीने सर्वत्र प्रदर्शित केला. या व्हिडीओत तोच वाघ एका माणसासारख्या दिसणाऱ्याला तोंडात धरून आणतो. त्याला खुर्चीचा आधार देत बसवितो अन् त्याच्या हातात पाण्याची बाटलीही देतो. हा व्हिडीओ पाहताक्षणिच बोगस असल्याचे ध्यानात येत होते. तशात तिसऱ्या दिवशी पुन्हा वाघ अन् त्या कथित माणसाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात जवळ आलेल्या वाघाला तो व्यक्ती पिस्तुलातून गोळी घालून ठार मारतो, असे दिसत होते. एकूणच काय तर, खरे की खोटे, या प्रश्नात काही वेळेसाठी अडकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या 'एआय'ने बनवेगिरी करणाऱ्यांना रान मोकळे केले आहे. त्यामुळे त्यांचे हौसले बुलंद झाले आहे. काहीही बनावट तयार करता येते, असा विश्वास पटल्यामुळे ही मंडळी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्डच काय बनावट नोटाही तयार करीत आहेत. ते कमी की काय म्हणून आता चक्क रेल्वेचे तिकीटही बनावट तयार केले जात असल्याचे उघड झाले आहे. बनावट तिकीट तयार करून प्रवासी रेल्वेला चुना लावत असल्याची पहिली घटना दि. १५ नोव्हेंबर २०२५ ला मुंबईच्या मस्जिद स्थानकावर, दुसरी घटना २६ नोव्हेंबर, तर तिसरी घटना २८ नोव्हेंबर २०२५ ला कल्याण दादर दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये उजेडात आली. 

रेल्वे अन् बनवाबनवी

रेल्वे आणि बनवाबनवी हे तसे घट्ट समीकरण आहे. रेल्वेगाडीत कधी बोगस टीसी आढळतो, तर कधी तोतया पोलिस सापडतो. कधी बोगस वेंडर, तर कधी नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट खाण्यापिण्याच्या चिजवस्तू, पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे आढळते. कधी रेल्वेच्या पार्सलमध्ये मिठाईच्या डब्यात नोटा तर कधी औषधाच्या बॉक्समध्ये ड्रग्ज आणि कधी तेलाच्या पिप्यात हवालाची रक्कम पाठविण्याची बनवाबनवीही झाली आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असल्याचा बनाव करणारी मंडळीच या गैरप्रकाराला जबाबदार आहे, हे सांगण्याची गरज नाही. मात्र, या एकूणच प्रकारामुळे ओरिजनल काय अन् डुप्लिकेट काय या विषयीचा गोंधळ वाढला आहे.


 

Web Title : एआई युग: असली बनाम नकली सामग्री की पहचान कैसे करें?

Web Summary : एआई असली और नकली के बीच की रेखाओं को धुंधला कर रहा है, जिससे विभिन्न क्षेत्रों में धोखाधड़ी बढ़ रही है। वीडियो गुमराह करते हैं, और नकली दस्तावेज, टिकट और अवैध गतिविधियां बढ़ रही हैं, जिससे भ्रम पैदा हो रहा है।

Web Title : AI Era: How to Identify Original vs. Fake Content?

Web Summary : AI blurs lines between real and fake, enabling fraud in various sectors. Videos mislead, and counterfeit documents, tickets, and illegal activities are on the rise, creating confusion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.