शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-एन’ देशातील सर्वोत्कृष्ट संस्था होणार

By admin | Updated: July 27, 2015 03:25 IST

आपल्या देशातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला दिशा देण्याची दर्जेदार संस्थांची जबाबदारी आहे.

नागपूर : आपल्या देशातील विद्यार्थ्यांकडे प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला दिशा देण्याची दर्जेदार संस्थांची जबाबदारी आहे. ‘आयआयएम-एन’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर) नवीन असले तरी येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून याचे नाव घेण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘आयआयएम-एन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या पहिल्या बॅचमध्ये देशातील ५७ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असून पहिल्या सत्राची सुरुवात झाली आहे.चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक डॉ. आशिष नंदा, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते.‘आयआयएम-एन’आल्यामुळे विदर्भासोबत महाराष्ट्रातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. भारतातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’सारख्या संस्था तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आघाडीवर आहे आणि हीच आज देशाची गरज आहे. जागतिक पातळीवर मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘आयआयएम-एन’च्या येण्यामुळे मिहानच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.विद्यार्थीच ‘यूएसपी’४महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ असल्यामुळे याच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर येतील, अशी अपेक्षा होती. याबाबत डॉ. आशिष नंदा यांना विचारणा केली असता उद्घाटनाच्या वेळी आमच्यासाठी विद्यार्थी जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर अनेकदा मान्यवर ‘आयआयएम-एन’ला येतील. परंतु प्रत्यक्षात हा क्षण विद्यार्थ्यांचा आहे, असे ते म्हणाले. उद्घाटनानंतर त्यांनी व्यक्तिश: विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.